शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

शाळांना किमान एक क्लार्क व शिपाई द्या!

By admin | Published: December 15, 2015 1:58 AM

शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये भरतीबंदी असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त आहेत. परिणामी, शाळा प्रशासनाने शाळा स्तरांवर नेमलेल्या एका क्लार्क

मुंबई : शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये भरतीबंदी असल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त आहेत. परिणामी, शाळा प्रशासनाने शाळा स्तरांवर नेमलेल्या एका क्लार्क व शिपाई कर्मचाऱ्याला शिक्षण विभागाने मान्यता देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळांमधील आकृतीबंधाचा अहवाल शासन स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित आहे. त्यामुळे भरतीबंदी झाली असून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास शिक्षण विभाग अनुमती देत नसल्याचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘भरतीबंदीचा परिणाम शाळांच्या प्रशासकीय कामावर झाल्याने अनेक शाळांनी त्यांच्या स्तरावर एका क्लार्क व शिपाई कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.’ मात्र, नियुक्त्यांना मान्यता देण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या हाती आहेत. शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींबरोबर ८ डिसेंबर रोजी झालेल्या चर्चेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा मुद्दा तत्त्वत: मान्य केल्याचा दावा शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे. प्रशासकीय कामांचा बोजवारा!विद्यार्थ्यांचे बोर्डाचे फॉर्म, शिष्यवृत्ती, सरल, योजनांची अंमलबजावणी शिवाय अशी अनेक कामे शाळेमध्ये लिपिक नसल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांना करावी लागत आहे. अनेक ठिकाणी ही प्रशासकीय कामे कुणी करायची, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने कामे खोळंबली आहेत. परिणामी, तातडीने क्लार्क व शिपाई पदांना मान्यता द्याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.आश्वासनाप्रमाणे शिक्षणमंत्र्यांनी आदेश काढावेत. अनेक शाळांमध्ये लिपिक व शिपाई संवर्गातील पदे रिक्त असल्याने कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. लिपिकाशिवाय कार्यालयीन कामकाज शक्य नाही. त्यामुळे अनेक शाळांनी एक लिपिक व शिपाई संवर्गातील पदे भरली असून, पदांना मान्यतेचे आदेश द्यावे. - अनिल बोरनारे, शिक्षक परिषदेच्या मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष