ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असून दलितांना शस्त्रं बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. हैदराबादमधील रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी पत्रकारांशी ते बोलत होते.
भाजपाशी आरपीआयची असलेली युती केवळ राजकीय असून दोन्ही पक्षांच्या विचारसरणीमध्ये काही साम्य नसल्याचं आठवले म्हणाले. बंडारू दत्तात्रेय या कामगारमंत्र्यांना नरेंद्र मोदींनी त्लरीत निलंबित करावं अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.
दलितांविरोधीतल अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, आणि गुन्हेगारांना शासन होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत कठोर भूमिका घ्यावी आणि दलितांना शस्त्रास्त्रे बाळगण्याचे परवाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे किमान दलितांना स्वत:चे व कुटुंबाचे रक्षण करता येईल असं आठवले म्हणाले.