मुंबई : एका चिंधी वेचणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी दोन जणांना जन्मठेपेची तर सात जणांना २० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या सर्वांना मिळून ४० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.ही घटना २१ सप्टेंबर २०१३ रोजी घडली. घटनेच्या काहीच दिवसांपूर्वी ४० वर्षीय पीडिता नंदुरबारहून मुंबईत आली होती. मुंबईत निवारा नसल्याने ती फुटपाथवरच राहत होती. नऊ आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या विशाल सूदला ती ओळखत होती. सूद हा केटरर होता.पीडिता सूदला ओळखत असल्याने तिने पोलिसांना त्याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर व त्याच्या आठ मित्रांवर गुन्हा नोंदवला. विशाल सूदसह मनप्रीतसिंह गिल, अजय गेचंद, वाहिद खान, महेश मारागजे, वसिम शेख, दस्तगीर खान, भुवन हमाल आणि धीरज पांचाळ उर्फ धीरू यांना सत्र न्यायालयाने सामूहिक बलात्काराप्रकरणी दोषी ठरवले आहे. मुलुंड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २१ सप्टेंबरच्या रात्री पीडिता उघड्या टेम्पोमध्ये झोपली होती. ती झोपेत असताना सूद आणि त्याच्या तीन मित्रांनी तिला खाली खेचले आणि जवळच असलेल्या एका शेडमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. (प्रतिनिधी)
दोन जणांना जन्मठेप
By admin | Published: February 23, 2017 5:06 AM