शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

"माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, मग दाखवतो सगळ्यांना"; उदयनराजे बेधडक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 3:36 PM

बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजे भोसले यांनी आता थेट सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय.

सातारा-

बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजे भोसले यांनी आता थेट सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय. "या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे सारखे ईडी म्हणजे काय चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढलं पाहिजेत", असं रोखठोक विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. 

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत उदयनराजे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. "सध्याची परिस्थिती इतकी कुणी बिघडवली याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझं आवडतं कार्टुन 'टॉम अँड जेरी' हे सुद्धा बघायचं मी बंद केलंय. आता सध्या सुरू असलेल्या राजकारण्यांच्या माकड उड्या बघत बसतो. खूप मजा येते. कोण-कोणाला आत टाकतंय. कोण कोणाला मारतंय. काय बोलणार आता यावर", असं उदयनराजे म्हणाले. 

"काही लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. त्यामुळे माझ्या हातात ईडी द्या. मग मी दाखवतो या सगळ्यांना. सध्या ईडी म्हणजे चेष्टा करुन ठेवलीय. पानटपरीवर बिडी मिळतेय ना तशी ईडीची अवस्था झालीय. मी तर म्हणतो यांना ताब्यात घ्या. चाप लावा सगळे सरळ होतील. एका बाजूला लोक कसे जगत आहेत आणि हे मात्र एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्ष जे जेलमध्ये होते त्यांनी काही केलेलं नाही. आता जे जेलमध्ये आहेत त्यांनीही काय केलेलं नाही. मग काय लोकांना डोळे, मेंदू नाहीत असं वाटतंय काय? लोक आता हसतात. आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार आहेत हे त्यांचं त्यांनाच माहित", असंही उदयनराजे म्हणाले.

 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय