शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

आर्थिक निकषासोबत शेतकऱ्यांना आरक्षण द्या,  शरद पवार यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 5:42 PM

आर्थिक निकषांसोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी म्हणून आरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी

 मुंबई - आर्थिक निकषांसोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी म्हणून आरक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत केली. मात्र मागास शेतकऱ्यांनाच आरक्षण द्यावे सधन वगैरे शेतकऱ्यांबाबत हा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, "दिवसेंदिवस शेती कमी होतेय. ८२ टक्के लोकांकडे २ एकरपेक्षा कमी शेती. तर ७० ते ७२ टक्के शेतजमीनीला पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषासोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्या वर्गाला शेतकरी म्हणून आरक्षण द्यायला हवे." तयारी न करता शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस लाभार्थी आणि निधीचा आकडा कमीकमी होत आहे, असा टोलाही शरदयावेळी पवार यांनी पुण्याच्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मांडलेल्या भूमिकेबाबतही स्पष्टीकरण दिले."मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात आधी झाली. महिला आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हाही मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे माझी भूमिका स्पष्टच होती. त्यावर एससी, एसटी आणि ओबीसी यांना घटनेने जे आरक्षण दिले आहे. त्याला धक्का लागता कामा नये. त्या व्यतिरिक्त अन्य घटकांना आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल, असे त्यांनी सांगितले. सहकारी बँकांना नोटा बदलून न देण्यात आल्याबद्दलही पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, गुजरात, कर्नाटक आदि राज्यातील सहकारी बँकातही काही नोटा बदलून देण्यात आल्या नाहीत. केरळ, तमिळनाडू, युपी येथेही  प्रभावी सहकारी बँका आहेत. या नोटांबाबत तीनवेळा केवायसी तपासणी करण्यात आली. आरबीआयच्या पथकानेच तपासणी केली. त्यात काही वावगे सापडले नाही. शेड्युल बँकांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. मात्र, जिल्हा सहकारी बँकांतील नोटा बदलून देण्यात आल्या नाहीत. ३० जानेवारी २०१८ ला नोटा बदलून देणार नसल्याच्याच सूचना सहकारी बँकांना देण्यात आल्या आहेत. या नोटा नष्ट कराव्यात आणि ताळेपत्रकात तो तोटा म्हणून दाखविण्याचा सल्ला सहकारी बँकांना देण्यात आला आहे. राज्यात सहकारी बँकांचे सुमारे  ११२ कोटींच्या नोटा अद्याप बदलून देण्यात आल्या नाहीत. जिल्हा बँकांत नीरव मोदीसारखे नव्हे तर सामान्य शेतकरी आणि नागरिकांची खाती असतात. या प्रकरणातून सरकारचे एकूण धोरण स्पष्ट होते. संसदेत अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न. अन्यथा थेट न्यायालयात मुद्दा मांडू. पी. चिदंबरम् याबाबत हा खटला लढवतील. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीagricultureशेतीreservationआरक्षण