लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गुरुवारी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. तसेच महागाईकडे लक्ष वेधणारे फलकही फडकविले.
होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी..., संपला निवडणुकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका..., खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले..., पुण्यात नाही चालले खोके, उदास झाले बोके...,या सरकारचं करायचं काय, गरीबांच्या घरात जेवण नाय..., शेतकऱ्यांची लाईट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..., बळीराजाला द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट..., महाराष्ट्राला द्या लाईट नाहीतर शेतकरी करतील टाईट..., अशा जोरदार घोषणा या आमदारांनी दिल्या.