ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणा-या 2015 वर्षाच्या पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे घोषणा केली. लोकमतचे नाशिकमधले छायाचित्रकार प्रशांत खरोटे आणि पुण्यामधल्या लोकमतच्या प्रतिनिधी सुषमा नेहरकर-शिंदे यांनाही गौरवण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सकाळ माध्यम समुहाचे संचालक संपादक उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला. पत्रकारांना दिला जाणारा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार पुण्यातील दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी मुस्तफा मुबारक आतार यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घोषणा केली.
पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान देणा-या ज्येष्ठ पत्रकार, संपादक यांना राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरवर्षी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2015 साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, लेखक, दैनिक सकाळ माध्यम समुहाचे संचालक संपादक आणि 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
महासंचालनालयामार्फत इतर विविध पुरस्कारांसाठी राज्यभरातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत या प्रवेशिकांची तपासणी करण्यात आली. या समितीने निवड केलेल्या पत्रकारांची नावेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जाहीर केली.
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - पुण्यातील दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी मुस्तफा मुबारक आतार यांना जाहीर करण्यात आला. 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - नागपूर येथील दैनिक हितवादचे वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र दिगंबर दिवे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - मुंबईतील दैनिक भास्करचे प्रतिनिधी विजयसिंह (कौशिक) यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशवंतराव चव्हाण पुरस्कार (शासकीय गट - मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तरीय) - यवतमाळ येथील प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश बाबाराव वरकड यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - रत्नागिरी येथील साम मराठीचे प्रतिनिधी अमोल अनंत कलये यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - नाशिक येथील दै. लोकमतचे छायाचित्रकार प्रशांत सोमनाथ खरोटे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रशांत खरोटे
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) - कोल्हापूर येथील विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार रोहीत बापू कांबळे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सोशल मीडीया पुरस्कार (राज्यस्तर) - पुण्यातील दै. लोकसत्ताचे प्रतिनिधी देविदास प्रकाशराव देशपांडे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - सातारा येथील दै. पुढारीचे प्रतिनिधी प्रविण शिवाजी शिंगटे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारांप्रमाणे विविध विभागीय पुरस्कारांचीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घोषणा केली. यात दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) हा अहमदनगर येथील दै. दिव्य मराठीचे स्टाफ रिपोर्टर नवनाथ संतुजी दिघे यांना जाहीर करण्यात आला. 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापैकी 10 हजार रुपये दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - परभणी येथील दै. श्रमीक एकजूटचे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार संतुकराव ठोके (हट्टेकर) यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग) - मुंबई येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी ज्ञानेश त्रिंबक चव्हाण यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे विभाग) - पुण्यातील दै. लोकमतच्या प्रतिनिधी श्रीमती सुषमा नेहरकर-शिंदे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुषमा नेहरकर - शिंदे
शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग) - चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील दै. तरुण भारतचे प्रतिनिधी राजेंद्र शंकर शिंदे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग) - कोल्हापूर येथील दै. पुढारीच्या वरिष्ठ पत्रकार श्रीमती प्रिया सतिश सरीकर यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग) - बुलढाणा येथील दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी दिनेश गणपतराव मुडे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) - नागपूर येथील दै. सकाळचे वरिष्ठ वार्ताहर मंगेश वामनराव गोमासे यांना जाहीर करण्यात आला. 41 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आज जाहीर करण्यात आलेले पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत.