शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

ग्लोबल सिटिझन महोत्सव प्रथमच होणार मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 1:40 AM

संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ््यापुढे ठेवून भारताला भेडसावणाऱ्या गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता

मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ््यापुढे ठेवून भारताला भेडसावणाऱ्या गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता यासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि समाजधुरिणांच्या संयुक्त प्रयत्नांतून एक लोकचळवळ उभी करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून पुढील महिन्यात मुंबईत ‘ग्लोबल सिटिझन्स’ महोत्सवाचे आयोजन होत आहे.हा महोत्सव येत्या १६ नोव्हेंबर रोजी होणार असून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरानंतर त्याच्या आयोजनाचा मान मिळणारे मुंबई हे पहिले शहर आहे. ‘ग्लोबल सिटिझन’ हे सामाजिक चळवळीचे व्यासपीठ आणि ‘दि ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड लीडरशिप फौंडेशन’ यांच्यातर्फे हा अभिनव उपक्रम हाती घेतला जातो. त्यांच्या ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ या भारतीय शाखेतर्फे मुंबईतील या महोत्सवाचे आयोजन होईल. महाराष्ट्र सरकार व संयुक्त राष्ट्र संघ यांच्या सहकार्याखेरीज इतरही अनेक संस्था त्यात सहभागी असणार आहेत. ‘दै. लोकमत’ या महोत्सवाचा मराठीतील ‘मीडिया पार्टनर’ असणार आहे.या महोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. त्याशिवाय यासाठी तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर अवघ्या महिनाभरात लोकांनी एक कोटी पाने भरतील एवढी आपली मतके नोंदविली आहेत व सन २०३० पर्यंत दारिद्र््याचे निर्मलन करण्याच्या १० लाखांहून अधिक कृतीकल्पना मांडल्या आहेत. यापैकी निवडक १८ हजार लोकांना महोत्सवासाठी नि:शुल्क तिकिटे वाटण्यात आली असून आणखी अशा ४० हजार तिकिटांचे वाटप व्हायचे आहे.मुख्य महोत्सवाला जोडूनच स्वच्छ भारत, लैंगिक समानता यासह अन्य अनुषंगिक विषयांवर स्वतंत्र कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विदेशातून आठ हजार तर देशातून २५ हजार लोक येतील आणि त्यातून पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योगाची सुमारे १३० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)२७ अब्ज डॉलरची घोषणा : सन २०१२ मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘ग्लोबल सिटिझन’च्या व्यासपीठावरून २७ अब्ज अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेची कटिबद्धता जाहीर करण्यात आली आहे. त्यातून होणाऱ्या कामांतून जगभरातील ७३ कोटी लोकांचे जीवन प्रभावित होईल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिचेल ओबामा, बिल आणि मेलिंडा गेट््स, महाराणी रानिया, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान कि मून व नेपाळ आणि नॉर्वेच्या पंतप्रधांनी याआधी न्यूयॉर्कमध्ये कटिबद्धता जाहीर केली आहे.