शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

World Sexual Health Day: नागपुरातील सेक्सवर्कर्स झाल्या आरोग्याबाबत ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:23 PM

नागपुरातील बदनाम पण नेहमीच चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरलेल्या गंगा जमुना या वस्तीतील सेर्क्सवर्कर्स आपल्या लैंगिक आरोग्याबाबत आता जागरूक झाल्या असल्याची वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देगंगा जमुना भागातील आरोग्य क्रांतीयेणाऱ्या पुरुषांमध्ये जागरुकतेचा अभाव

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपुरातील बदनाम पण नेहमीच चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरलेल्या गंगा जमुना या वस्तीतील सेर्क्सवर्कर्स आपल्या लैंगिक आरोग्याबाबत आता जागरूक झाल्या असल्याची वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या हेमलता लोहवे पांडे यांनी ही माहिती देताना, कंडोमशिवाय आता या सेक्सवर्कर्स आपले काम करण्यास सरळ स्पष्ट नकार देतात व लैंगिक आरोग्याबाबतच्या कुठल्याही प्रश्नाबाबत त्या खूप सजग असल्याचे सांगितले.या भागात आपण २००४ साली जेव्हा काम सुरू केले तेव्हा येथे लैंगिक आरोग्याबाबत अनास्थाच जास्त होती. त्याची भीती वाटत असली तरी त्याबाबत काळजी घेण्याचे भान नव्हते. हळूहळू येथील सेक्सवर्कर्सला लैंगिक आरोग्याची माहिती देत देत त्याबाबत त्यांना जागरूक करण्यात आले. त्या वेळची पिढी आता बदलून नवीन पिढी येथे आली आहे. ही पिढी अधिक जागरूक आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळेही त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. गेल्या आठ वर्षांपासून त्यांना रेड क्रॉसतर्फे लैंगिक शिक्षणाचे ट्रेनिंग दिले जात आहे. या सेक्सवर्कर्स आता एकमेकींशी लेैंगिक आजाराबाबत स्पष्टपणे बोलतात व तात्काळ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतात. या महिलांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. मात्र एखाद्या आजाराबाबत थोडीशी जरी शंका आली तरी त्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतात. या क्षेत्रात नव्यानेच आलेल्या मुलीलाही त्या लैंगिक आरोग्याचे सर्व शिक्षण व खबरदारीचे उपाय सांगत असतात. दुसरे म्हणजे, एखाद्या लैंगिक आजारावर आता घरगुती उपाय येथे कोणीच करत नाही. सर्वजण डॉक्टरांचाच सल्ला घेतात. या सेक्सवर्कर्सकडे येणाऱ्या पुरुषांमध्येच जागरुकतेचा अभाव आढळत असल्याचे लोहवे यांनी सांगितले.

जागतिक लैंगिक आरोग्य दिनाविषयी..वर्ल्ड असोसिएशन फॉर सेक्श्युअल हेल्थने जागतिक लैंगिक आरोग्य दिन हा प्रथम २०१० साली सप्टेंबरच्या ४ तारखेला साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार दरवर्षी या दिवशी एक घोषवाक्य या क्षेत्रातील संस्थाना दिले जाते. यंदाचे घोषवाक्य हे, सेक्श्युअल हेल्थ अ‍ॅन्ड राईटस ; फंडामेंटल फॉर वेल बिर्इंग असे आहे.

टॅग्स :World Sexual Health Dayजागतिक लैंगिक आरोग्य दिन