शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी जाताय...तर सावधान !

By admin | Published: June 19, 2016 9:18 PM

पावसाच्या रिमझिममध्ये समुद्राच्या लाटांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर आपसुकच वळतात.

मनीषा म्हात्रे

मुंबई, दि. 19 -  पावसाच्या रिमझिममध्ये समुद्राच्या लाटांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर आपसुकच वळतात. मात्र हाच आनंद पर्यटकांच्या जिवावर बेतत असल्याचे समोर येते आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहात वर्षाला शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे किमान समुद्र किनाऱ्यांवर जाताना थोडी सावधानता बाळगा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील जुहू, गोराई, वरळी, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, आक्सा, मढ मरिन लाइन्ससह, बोर्डी-डहाणू, केवळे-माहीम, अर्नाळा, रायगड जिल्ह्यातील किहिम, अलिबाग, रेवदंडा, जंजिरा-मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील हेर्णे-मुरूड, गुहागर, वेळणेश्वर, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मिठबाव, कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ला येथील समुद्र किनारे पर्यटकांच्या दृष्टीने आनंद पर्वणी असतात. परंतु दुर्दैवानं दरवर्षी समुद्रकिनारी जवळपास शेकडोपेक्षा जास्त जण अतिउत्साहात बुडून मृत्युमुखी पडल्याचे विदारक दृष्य पाहावयास मिळते. इतकेच नव्हे तर, गेल्या देन-तीन वर्षांत ही संख्या वेगाने वाढत चालल्याचे दिसून येते. आजवर ज्या ज्या ठिकाणी पर्यटक बुडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, त्यापैकी बहुतांश ठिकाणी स्थानिक लोकांनी संबंधित पर्यटकाला तेथील समुद्राच्या आत जाऊ नका, असे सांगितल्याचे ऐकू येते. तसेच स्थानिकांकडून पर्यटकांना पाण्यातून बाहेर येण्याच्याही सूचना केल्या जातात. मात्र बहुतेक पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि मग मरू द्या त्याला असे म्हणत निघून जातात, नाही तर त्याची मजा बघत बसतात. अशाच सूचनांकडे मुरुड येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुले आणि मुली समुद्रात ओढल्या गेल्या. समुद्राच्या आत जाऊ नका हे सांगण्यासाठी सरकारी माणूस सज्ज असेल किंवा न ऐकणा-यावर कायदेशीर कारवाईचे अधिकार स्थानिक माणसांकडे असतील तरच त्यांचा वचक पर्यटकांवर बसू शकेल. त्यामुळे पर्यटनासाठी समुद्र किना-यांवर जाताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईत सेल्फी घेताना दोघांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील समुद्र किनारे, चौपाट्यांवर नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी पर्यटकांना सेल्फी काढण्यास मनाई केली. मात्र त्याच्या काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळाली. आजही मोठ्या संख्येने समुद्रात उतरून सेल्फी काढण्याची धडपड करताना दिसत आहे. रविवारीही पावसाची मजा घेत गोराई आणि जुहू समुद्रात उतरलेले पाच जण बुडू लागले. अचानक आलेल्या भरतीच्या लाटत ओढले जात असताना तेथील जीवरक्षकांनी त्यांना वाचविले म्हणून त्यांची यातून सुटका झाली. मात्र आणखी किती? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे पर्यटकांनीच स्वत:च्या जिवाची काळजी घेत समुद्र किना-यावर पर्यटनासाठी जाताना थोडी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे. आनंद लुटताना सुरक्षेला प्राधान्य गरजेचे

पर्यटकांच्या सागरी मृत्यूमुळे समुद्राला बदनाम करण्यापेक्षा, पर्यटनाचा आनंद लुटताना स्थानिक परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक निर्बंध-नियम यांची माहिती स्थानिकांकडून करून घेऊनच पुढील पाऊल टाकणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. पाणी सर्वत्र सारखे नसते, स्विमिंग पूलमध्ये पोहता आले म्हणजे कोणत्याही जलाशयात आपण पोहू शकतो, असा खोटा आत्मविश्वास मनात ठेवून आपल्याच जीवनास आव्हान देण्याचे खोटे धाडस करणे योग्य नाही, असाच बोध या दुर्दैवी घटनांनंतर घेणे आवश्यक आहे, इतके मात्र नक्की.सागरी पाण्याची कल्पना नसणा-या पर्यटकांचे मृत्यू

मुरुड समुद्र किनारी यापूर्वी महिंद्रा कंपनीतील ११ कर्मचा-यांचा, तर ६ जुलै २०१४ साली घाटला(चेंबूर) गावांतील सहा जणांचा, रत्नागिरी जिल्ह्यात सहा जणांचा, बेळगावमधील दोन बहिणींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबाग येथे, तर २६ सप्टेंबर २०१५ रोजी गुहागर समुद्रात सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या सर्व घटनांच्या आधी स्थानिकांनी त्या पर्यटकांना धोक्याची सूचना आणि कल्पना दिली होती, पण त्यांनीही ती नाकारली होती, असे पोलीस नोंदीत नमूद केले आहे. हे सारे पर्यटक समुद्र किना-यापासून लांबच्या भागातील रहिवासी असल्याने त्यांना समुद्राचा अनुभव नव्हता. समुद्राची स्थानिक पातळीवरील माहिती नसणे आणि स्थानिकांच्या सूचनांचा अव्हेर यामुळे या दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी घडलेल्या दुर्घटना१ फेब्रुवारी २०१६ - पुण्याच्या कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १४ विद्यार्थ्यांचा रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. या महाविद्यालयातील १३० विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्या दरम्यान ही घटना घडली. ............................२२ फेब्रुवारी २०१६- नागाव समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील सात पर्यटकांपकी एकाचा बुडून मृत्यू झाला. सहदेव गणपत चव्हाण असे या पर्यटकाचे नाव आहे. ...........................२८ मे २०१६ - वसई येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली. प्रथमेश शिशुपाल आणि हितेश पाटील अशी त्यांची नावं आहेत...........................९ मे २०१५ - मालाड येथील आक्सा बिचवर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दिपक नामदेव शिंदे या ३१ वर्षाच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला