शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

By admin | Published: August 29, 2015 1:45 AM

मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही

मुंबई : मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना केवळ महाराष्ट्राची संस्कृती देशभर पोहोचवण्यासाठी या महिला पंजाबला जात आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा शलाका कोरगांवकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.कोरगांवकर म्हणाल्या, महाराष्ट्र शीख असोसिएशनने पंजाबमधील अमृतसरमध्ये दहीहंडीचे आयोजन केले आहे. महिलांचा येण्याजाण्याचा खर्च मंडळाने केला असून, आयोजकांनी तेथील सर्व व्यवस्था केली आहे. याआधी हे पथक द्वारका, डाकोर, उडप्पी, मथुरा, कर्नाटक (निप्पाणी), जयपूर, उजैन, वाराणसीला जाऊन आले आहे. अलीकडेच घुमान येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिला पथकाला दहीहंडी फोडण्याचे निमंत्रण मिळाल्याने महिलाही जाण्यासाठी उत्सुक आहेत. २ सप्टेंबरला ट्रेनने पंजाबला जाणार असून, ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोकुळाष्टमीला महिला एक हंडी आणि दुसऱ्या रात्री दोन हंड्या फोडणार असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष दलजित सिंग बल यांनी सांगितले की, मुंबईप्रमाणे पंजाबमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय आणि पंजाबी लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक बळकट झाली आहे. त्यात अधिक भर टाकण्यासाठी हा उत्सव पंजाबमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न आहे. महिला पथक दहीहंडी उत्सवासाठी पंजाबमध्ये येणार असल्याचे कळताच दिल्ली गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीनेही पंजाबमधील ८० खोल्यांची इमारत मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या जेवणाचा खर्चही कमिटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय तळमळतेने गोकुळाष्टमीची वाट पाहणाऱ्यांनी उत्सवाठिकाणीच आठवडाभर गीता प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आहे.मंडळांनी स्वत:वर निर्बंध घालावेसार्वजनिक गोविंदा पथकांनी स्वत:वर निर्बंध घातल्यास न्यायालयाला निर्बंध घालण्याची गरज भासणार नाही, असेही शलाका कोरगांवकर म्हणाल्या. उत्सवाला अर्थकारणाचा संदर्भ लागल्याने उत्सवाचे रूप बदलले आहे. न्यायालयाने उत्सव साजरू करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ उत्सवातील अर्थकारण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ न काढता मंडळानी उत्सव साजरा करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.