शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जाता पंढरीसी... अमुचा राम राम घ्यावा

By admin | Published: June 28, 2017 11:19 PM

जाता पंढरीसी... अमुचा राम राम घ्यावा

!लोकमत न्यूज नेटवर्कवाठार निंबाळकर : सातारा जिल्ह्यातील चार दिवसांचा मुक्काम आटोपून व बरड (ता. फलटण) ग्रामस्थांचा सत्कार स्वीकारून श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (दि. २८) सकाळी ‘माउली-माउली’च्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या माउलींच्या पालखीला जिल्ह्यातील हजारो भाविकांनी निरोप दिला.बरड येथील शेवटचा मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी आरती, अभिषेक व इतर विधी पार पडल्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. राजुरी येथे सातारा जिल्हा व फलटण तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपजिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, राजुरीच्या सरपंच कौशल्या साळुंखे, उपसरपंच भारत गावडे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीला निरोप देण्यात आला. सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच याठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार हणमंतराव डोळस, आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, माळशिरस सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक विरेश प्रभु यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रथमच या स्वागत सोहळ्याला हजेरी लावली. तर माजी मंत्री बबनराव पाचपुते वारीत सहभागी झाले. पालखी सोहळा निर्वीघ्नपणे पार पडल्याबद्दल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.