ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २९ : गोव्यात कदंब महामंडळाकडे ग्रामीण भागात बससेवा सुरु करण्यासाठी सुमारे ४0 वेगवेगळ्या मार्गांचे प्रस्ताव पडून आहेत. मात्र या खेडेगावांमध्ये बसेस सुरु केल्यास ते परवडण्यासारखे नसल्याने या मागणीला महामंडळ इतकी वर्षे न्याय देऊ शकलेले नाही.कदंब महामंडळ हे राज्य परिवहन महामंडळ आहे. महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही खेडेगावांमधून येट पणजीला येण्याजाण्यासाठी बसगाड्यांसाठी मागणी आहे परंतु ती केवळ सकाळी कार्यालयांमध्ये पोचण्यासाठी आणि सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. गाड्या सुरु केल्या तर मधल्या वेळेत प्रस्तुत मार्गांवर प्रवाशी मिळणे दुरापास्त असल्याने बसेस सुरु करणे मुश्किल बनले आहे. काही ठिकाणी परमिटचीही समस्या आहे. मोर्लपिर्ला (केपें) ते पणजी, कष्टी ते पणजी, बेतुल ते पणजी, बांबार ते मडगांव, धावें (वाळपई) ते पणजी, मांद्रे ते पणजी तसेच मांद्रेतील अंतर्गत भागातून पणजीला थेट येण्या-जाण्याची सोय व्हावी यासाठी बसगाड्या सुरु करण्याची मागणी आहे.खाजगी बसमालक केवळ सोयीचे आणि फायदेशीर मार्गच स्वीकारतात आणि तशीच परमिटे मिळवतात. त्यांनी खेडेगावांकडे पाठच फिरवली आहे. कदंबच्या बसगाड्याही अनेक खेड्यांमध्ये पोचलेल्याच नाहीत. विजयदुर्ग (केरी, फोंडा) माशेलमार्गे पणजी अशी येण्या-जाण्यासाठी बससेवा सुरु करावी, अशी मागणी आहे. काही ग्रामीण मार्गांवर कदंबने मागणीनुसार बसेस सुरु केलेल्या आहेत त्यात काणकोण ते सावर्डे व्हाया बाळ्ळी, खोर्जुवें-पणजी आदी मार्गांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात खेडेगावात नवीन मार्ग घेतलेले नसले तरी गेल्या दोन वर्षात किमान ५0 नव्या ग्रामीण मार्गांवर कदंबने बससेवा सुरु केलेली आहे.
आठवडाभरात २0 नव्या बसगाड्या दरम्यान, आठवडाभरात २0 नव्या बसगाड्या ह्यकदंबह्णला मिळणार असल्याची माहिती घाटे यांनी दिली. सध्या महामंडळाकडे एकूण ५२८ बसगाड्यांचा ताफा आहे. जुनरुम योजनेखाली आतापर्यंत सुमारे १00 बसेस मिळालेल्या आहेत. नव्या २0 बसेस आल्यानंतर जुन्या बदलल्या जातील. या बसगाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे बीएस-फोर इंजिन या बसगाड्यांसाठी वापरण्यात आले आहे.