शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:13 AM

दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.

मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक, असे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.

लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापलिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील, हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.

राजकारणात कटुता वाढलीअलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात  कटुता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र, राजकारणात कटुता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची  संस्कृती नाही. कटुता असेल तर ती  सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मीदेखील करेन, पण एक चांगले आहे की, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यांच्याही आल्या नाहीत, पण अजून दिवाळी संपायची आहे, असेही ते म्हणाले.

पुन्हा युती होणार का? राजकारणात अशक्य काहीच नसते. हा सिद्धांत पाहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत कधी पुन्हा युती होईल का, असे विचारले असता, राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांनादेखील राजकारणात उत्तरे नसतात. ती दिली तर संशयाचे वातावरण उगाचच निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले.

...आवाज न करणारे फटाकेमहाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी जोरदार धमाके करणारे  देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मात्र आवाज न करणारे फटाके फोडायला आवडतात. नवनवीन गाड्या रात्री-बेरात्री एकट्यानेच ते अजूनही मुंबईत ड्राईव्ह करतात. राजकारणाच्या पलीकडच्या  प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आपण रात्री-बेरात्री मरिन ड्राईव्ह वगैरे ठिकाणी मित्रांकडील नवीन गाडीने तास-दोन तास फेरफटका मारत असतो, अशी नवीन माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. भुईचक्र, अनार असे आवाज न करणारे फटाके मला फोडायला आवडतात, माझे राजकीय फटाकेही आवाज करणारे नसतात, अशी कोटीही त्यांनी केली.

मी ‘सागर’वर सुखी आहेवर्षा बंगल्यावर जाऊ न शकल्याबद्दल छेडले असता, फडणवीस म्हणाले, शेवटी वर्षा सागरालाच जाऊन मिळते. बंगला कुठला ते महत्त्वाचे नाही. काम महत्त्वाचे असते. सध्या मी सागर/मेघदूतमध्ये आहे, सागर सकारात्मक आहे. मी इथे सुखी आहे. वर्षावर जाण्याचा कुठलाही विचार नाही. ‘आपल्यात संयम खूप आहे आणि तो इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेला आहे. फक्त भूक लागली की, माझा संयम ढळतो,’ असे खुसखुशीत उत्तर त्यांनी एका प्रश्नात दिले.

शिंदेंचा दिनक्रम हा  संशोधनाचा विषयरात्री उशिरापर्यंत जागून सकाळी पुन्हा दिनक्रम सुरू करणे हा माझ्या सवयीचा भाग आहे. मी रात्री तीनला झोपतो आणि आठला उठतो. पाच तास झोप घेतो, पण आठवड्यातून तीन-चार दिवस असे होते की, मला सकाळी ६ ला उठून तयार व्हावे लागते, पण या दिनक्रमाची आता सवय झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे तर रात्री झोपतच नाहीत. बहुधा त्यांचा दिनक्रम हा संशोधनाचा विषय आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण