शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द

By admin | Published: August 22, 2016 5:43 AM

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले वादग्रस्त सनदी अधिकारी भगवान सहाय यांना अखेर कृषी खात्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

मुंबई : असंवेदनशील वर्तनामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले वादग्रस्त सनदी अधिकारी भगवान सहाय यांना अखेर कृषी खात्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रविवारी सरकारने सहाय यांच्या फेरनियुक्तीचा आदेश मागे घेतला.कृषी खात्यात अप्पर मुख्य सचिव पदावर असताना, भगवान सहाय यांच्यावर असंवेदनशील वर्तनाचा आरोप झाला. कारवार्ईची मागणी करत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. सहाय यांना १२ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला, परंतु २४ तासही होत नाहीत, तोवर नवा आदेश काढण्यात आला. सुट्टीवरून परतल्यावर सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केले जाईल, असा लेखी आदेशच शनिवारी सरकारने काढला होता. सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नेमल्यास आंदोलनाचा इशाराही कर्मचारी संघटनांनी दिला होता. याची दखल घेत, रविवारी शासनाकडून सुधारित आदेश जारी करण्यात आला आणि कृषी विभागातील फेरनियुक्तीबाबतचा भाग वगळण्यात आला आहे. मात्र, नव्या आदेशात भगवान सहाय सुट्टीनंतर नक्की कोणत्या पदावर रूजू होतील, याचा उल्लेख नाही. कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलाने आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे घाडगे यांनी घरी जाण्याची परवानगी मागितली होती. सहाय यांनी ती नाकारली होती. त्यानंतर घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी संबंधित अधिकारी मूळ गावी गेले असता, त्यांच्याकडे रजेच्या अर्जाबद्दल सहाय यांनी जाब विचारला. त्यांच्या या असंवेदनशील वर्तनावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)