नाशिक : गोदातीरी मंगळवारपासून सिंहस्थ कुंभपर्वास आरंभ होत असून, धर्मध्वजारोहणाने १३ महिन्यांच्या धार्मिक महोत्सवाची सुरुवात होईल. मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरू आणि रवी यांचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर नाशिकला वैष्णवांचा, तर त्र्यंबकेश्वरला शैव पंथियांचा मेळा भरणार आहे. नाशिकला रामकुंडावर, त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावर पुरोहित संघातर्फे धर्मध्वजारोहण होईल. कुंभपर्वाच्या पूर्वसंध्येला निघालेल्या शोभायात्रेत अनेक साधू-महंत सहभागी झाले होते. ‘हरित कुंभ’... यंदा ‘हरित कुंभ’ संकल्पना राबविली जात आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हजारो स्वयंसेवकांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे.दृष्टिक्षेपात सिंहस्थ..- 2,378 कोटींचा विकास आराखडा- 15कोटी रुपये बॅ्रण्डिंगसाठी- 22 हजार पोलिसांचा फौजफाटा- 14 वाहनतळांची निर्मिती- 36 विशेष गाड्या मध्य रेल्वे सोडणार- भाविकांसाठी निवाराशेड व ‘कम्युनिटी किचन’- रिंगरोड निर्मिती, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण
गोदातीरी आजपासून महाकुंभ
By admin | Published: July 14, 2015 3:34 AM