मुंबई : नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते. ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दवबिंदू गोठले होते. मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे.दिवसासह रात्री वाहणारे थंड वारे कमाल आणि किमान तापमान घसरण्यास कारणीभूत आहेत. रविवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर येईल. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.सांगलीत ७२ वर्षांचा विक्रम मोडलासांगली जिल्ह्यात १५ फेब्रुवारी १९७२ मध्ये ८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीला ८.४ अंश सेल्सिअस इतक्या कमी विक्रमी तापमानाची नोंद झाली.विदर्भात लाट१० फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज१० फेब्रुवारी : विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातथंडीची लाट११ फेब्रुवारी : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा१२ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा अंदाज१३ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल.१२ फेब्रुवारी : उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होईल
गोदाकाठ शून्यावर, दवबिंदू गोठले; नाशिक जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 5:15 AM