गजानन दिवाण - औरंगाबाद
74क् जणांचे हे एक गावच. भीक मागायची. त्याच पैशातून दारू प्यायची. मिळालेले तुकडे खायचे. यात बायकाही मागे नसत. अंघोळ त्यांना ठाऊकच नव्हती. पिण्याचे पाणी प्रातर्विधीला वापरणो ते पाप समजायचे. घरात स्वयंपाक करून जेवण करतात, हे त्यांच्या गावीही नव्हते. सखूबाईने समाजाचा विरोध पत्करत पायपुसणो तयार करण्याची कला अवगत केली. त्याचे प्रशिक्षण इतर महिलांनाही दिले. आज प्रत्येक घरात चूल पेटते. भीक मागण्याचे प्रमाण 4क् टक्क्यांवर आले आहे. आता त्यांची पोरं शाळेतही जाऊ लागली आहेत. एखाद्या जादूगाराने करावा, असा हा बदल सखूबाईच्या एका बंडाने झाला.
सखूबाई बंडीधनगर. वय वर्षे 63. जन्म कुठला ठाऊक नाही. कर्नाटक वा आंध्र प्रदेशातला असावा. 31व्या वर्षीच नव:याचा मृत्यू झाला. एकूण 1क् मुले. तीन गेली. सात मुले आणि एक मुलगी. .
कसरतीचे खेळ करताना या समाजातील काही तरुण सनई-ढोल वाजवायचे. कॉ. माणिकराव जाधव यांच्या मदतीतून येथे आठ घरे बांधण्यात आली. ‘गोकूळ नगरी’ असे या वस्तीला नाव देण्यात आले. पुढे मुंबईच्या एका बिल्डरने सा:यांनाच घरे बांधून दिली. 1999मध्ये भटके विमुक्त विकास परिषदद्वारा संचलित गो¨वंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद स्थापन करण्यात आली. सखूबाई आता या परिषदेच्या अध्यक्षा आहेत. गोपाळ समाजाच्या पंचायतीच्या सदस्य आहेत. शिक्षणाची गंगा वाहती करायची आहे.
मिशन सखूबाई : भीक मागितल्यानंतर सर्व एकत्र यायचे. सारे तुकडे एकत्र करायचे. एक डोके एक हिस्सा. डोके मग ते प्राण्याचेही. घरात कुत्रे असेल तर त्याचाही वेगळा हिस्सा. गरोदर महिलेच्या पोटातील बाळालाही वेगळा हिस्सा, अशी त्यांची पद्धत. आता भीक मागण्याचे प्रमाण 4क् टक्क्यांवर आले आहे. सखूबाईला ते झीरो टक्क्यावर आणायचे आहे.
मुलांची नावे खोकल्या, गांजा.. : जागा मिळाली. नागरिकत्व मिळाले. रेशनकार्डवर नाव आले. एकेकाची तीन-तीन नावे. शाहरूख, सलमान, अमिताभ. एकाचीच ही सारी नावे. स्वत:ला नाव नाही, मग पोरांची काय ठेवायची? गांजा पिणा:याचे नाव गांजा, सतत खोकणा:याला खोकल्या. पुढे मात्र नाव ठेवण्याची पद्धतही सुरू झाली.