लीटरमागे दोन रुपये : 11 जूनपासून होणार दरवाढीची अंमलबजावणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात दीड व विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या विक्री दरात पंधरा दिवसांपूर्वीच वाढ झाल्याने केवळ खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ केली जाणार आहे. नवीन दरवाढीची अंमलबजावणी 11 जूनपासून होणार असून, कोल्हापुरात म्हशीचे दूध 46, तर मुंबईत 5क् रुपये प्रति लिटरने ग्राहकांना घ्यावे लागणार आहे.
स्पर्धक दूध संघांनी दुधाच्या दरात वाढ केल्याने ‘गोकुळ’ने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. गायीच्या विक्री दरात पंधरा दिवसांपूर्वी वाढ केली आहे. त्यामुळे आता त्यामध्ये वाढ न करता गायीच्या खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘गोकुळ’ने दूध खरेदी व विक्री दरात दुस:यांदा वाढ केली आहे. (प्रतिनिधी)
च्सर्वच दूध संघांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याने वारणा दूध संघालाही दरवाढ करावी लागणार आहे. याबाबत सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती ‘वारणा’ संघाचे जनरल मॅनेजर (मार्केटिंग) बी. बी. भंडारी यांनी दिली.
स्पर्धक संघांनी दरवाढ केल्याने ‘गोकुळ’ला दरवाढ करावी लागत आहे. विक्री व खरेदी दरवाढीतील तफावतबाबत काहीजण प्रश्न उपस्थित करतात, पण कर्मचा:यांच्या पगारात दर सहा महिन्याला वाढ होते. विजेच्या बिलात वाढ होत असल्याने ही तफावत ठेवावी लागत आहे. तरीही ‘गोकुळ’च्या एकूण उत्पन्नातील 8क् टक्के वाटा दूध उत्पादकांना दिला जातो. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही.
- डी. व्ही. घाणोकर (कार्यकारी संचालक, गोकुळ)
म्हैस -
फॅट जुना दरनवीन दर
रुपयातरुपयात
6.क्31.1क्32.6क्
7.क्34.1क्35.6क्
8.क्37.1क्38.6क्
9.क्4क्.1क्41.6क्
1क्.क्43.1क्44.6क्
म्हैस दूध नवीन दर
शहरजुना दर नवीन दर
रुपये रुपये
मुंबई 485क्
पुणो485क्
कोल्हापूर4446
गाय (टोण्ड) दुधाची पंधरा
दिवसांपूर्वी झालेली दरवाढ -
मुंबई3436
कोल्हापूर3234