लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : १६ जूनपासून रत्न आणि दागिने उद्योगावर अनिवार्य हॉलमार्किंग लागू केले आहे. मात्र, बऱ्याच समस्या अद्याप सोडवल्या नाहीत. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये अचानक बदल करताना ज्वेलरी उद्योगाच्या संस्थांबरोबर चर्चाही केली नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने सोमवारी राज्यभर लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.
देशात हॉलमार्किंग केंद्रांच्या कमतरतेमुळे भारतभर हॉलमार्किंगची अंमलबजावणी अशक्य आहे. यामुळे संपूर्ण उद्योग आणि मूल्य साखळी विस्कळीत होईल आणि लाखो लोकांचे जीवनमान धोक्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
फेडरेशनच्या मागण्या
हॉलमार्किंग विक्रीच्या ठिकाणी लागू असावेनागरी स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी नोंदणी रद्द करण्याची तरतूद उद्योगासाठी हानिकारक ठरू शकते १० लाखांपर्यंत दंड, तुरुंगवास आणि परवाना रद्द केल्याने, ‘इन्स्पेक्टर राज’ची बळावण्याची भीती