शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

लक्ष्मी मंदिरातून सोन्याच्या मुर्तीची चोरी

By admin | Published: July 25, 2016 8:28 PM

येथील लक्ष्मी देवीच्या मंदिरातून पाच तोळे सोन्याची बनविलेली लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याचबरोबर १० गॅ्रम चांदीसह सुमारे १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. २५  : खरातवाडी (ता. पंढरपूर) येथील लक्ष्मी देवीच्या मंदिरातून पाच तोळे सोन्याची बनविलेली लक्ष्मीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याचबरोबर १० गॅ्रम चांदीसह सुमारे १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. ही घटना सोमवार दि. २४ जुलै रोजी उघडकीस आली.

आषाढ महिना असल्याने मंगळवार दि. १९ जुलै रोजी खरातवाडीतील लक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात आली होती. या यात्रेसाठी पंचक्राशीतील भाविक भक्तांनी गर्दी केली होती. मात्र या यात्रेच्या काळात बुधवारी व गुरूवारी चोरट्यांनी देवीच्या मंदिरात पाच तोळे सोन्यापासून तयार करण्यात आलेली देवीच्या मूर्तीची सोमवारी (दि. २४ जुलै) खरातवाडी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सोन्याची देवीची मूर्ती तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी अर्धा तोळा, तोळा असे सोने आपआपल्या परीने दान केले होते.

यातून ही मूर्ती बनविण्यात आली होती. याच बरोबर १० ग्रॅम चांदीही ग्रामस्थांनी दान म्हणून देवीला अर्पण केली होती. पाच तोळे सोन्याच्या मूर्तीसाठी सुमारे दीड लाख रूपये व १० हजार रूपये किंमतीची चांदी असा १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लक्ष्मी देवीच्या देवळातून चोरून नेला. याबाबत देवीचे पुजारी दादा समर्थ खरात व हरिभाऊ खरात यांनी करकंब पोलीस ठाण्यात खबर देण्यासाठी गेले होते. मात्र तेथील पोलिसांनी साहेब सध्या नाहीत तुम्ही उद्या या, साहेबांना सांगून तक्रार घ्यावी लागेल, असे सांगितल्याने करकंब पोलीस ठाण्यात अद्याप या घटनेचा गुन्हा दाखल झाला नाही. लक्ष्मी मातेच्या मूर्तीसाठी गावातील दानशूर लोकांनी सोने व चांदी दान दिले होते. यातूनच देवीची मूर्ती बनविण्यात आली आहे. मागील मंगळवारी यात्रा पार पडली. मात्र बुधवारी अथवा गुरूवारी चोरट्यांनी ही देवीची मूर्ती मंदिरातून लंपास केली आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी आम्ही करकंब पोलीस ठाण्यात आज (सोमवारी) गेलो होतो. मात्र ठाणे अंमलदार यांनी आम्हाला साहेब नाहीत, उद्या या, असे सांगितले.- हरिभाऊ खरात ग्रामस्थ, खरातवाडी