शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

पावणेदोन कोटींचे सोने जप्त

By admin | Published: April 05, 2017 6:06 AM

गेल्या ७२ तासांत एआययूने मुंबई विमातळावरुन केलेल्या विविध कारवाईत पावणे दोन कोटींचे सोने जप्त केले आहे.

मुंबई : गेल्या ७२ तासांत एआययूने मुंबई विमातळावरुन केलेल्या विविध कारवाईत पावणे दोन कोटींचे सोने जप्त केले आहे. यामध्ये बँकॉक एअर लाइन्समधील वरिष्ठ सुरक्षा रक्षकालाही अटक करण्यात आली आहे. तसेच एका फुटबॉल खेळाडूसह दक्षिण आफ्रिकेच्या हॉटेल मालकाला केशर आणि ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दुबई, बँकॉकवरुन मुंबईत मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असल्याचे चित्र मुंबई विमानतळावर होत असलेल्या कारवाईतून समोर येत आहे. ३ एप्रिलला एअर इंडियाच्या फ्लाइटने बँकॉकवरुन आलेल्या समीना अल्ताफ शेख (३१) या महिलेकडून तपास यंत्रणेणे २२९ ग्रॅम सोने जप्त केले. समीना गोरेगाव येथील रहिवासी आहे. त्यापाठोपाठ उल्हासनगरच्या दिनेश चेल्लानी (३०)कडून ५ लाख ५८ हजार किंमतीचे १८६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.तर, दुबईवरुन आलेल्या विद्यानगर अन्वर शफी (३३) या प्रवाशाकडे ५०० ग्रॅम सोने आढळून आले. केरळचा रहिवासी असलेल्या शफीने बंगलोर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. यापूर्वी १५ जून २०१५ मध्ये त्याला सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यासह केरला नसीर अब्दुल खादेर, आणि कनडाच्या अर्जुन मंघानी (२७)लाही सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्यासह ठाण्याच्या राजेश राजगोपालन (४५) याच्याकडून तब्बल ६० लाख १५ हजार किंमतीचे ५०० गॅ्रम सोने ताब्यात घेण्यात आले. तो व्यापारी आहे. त्याने पहिल्यांदाज दुबई ते मुंबई असा प्रवास केल्याचे समोर आले. या तस्करांभोवती कारवाईचा फास आवळल्यानंतर तपासाअंती मोहम्मद सोहेल (४६) हा तपास यंत्रणेच्या जाळ्यात अडकला.बँकॉक एअर लाईन्सच्या फ्लाईटमध्ये रात्रपाळीवर असलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अमित भोसटेकरच्या संशयास्पद हालचालीही तपास यंत्रणेंनी हेरल्या. त्याच्या केलेल्या झडतीत ७८ लाख किमतीचे २ किलो ६ ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले. त्याच्यासह तेथील प्रवासी मोहम्मद सोहेललाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल पावणे दोन कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) >ड्रग्ज तस्करीत हॉटेल मालकड्रग्ज तस्करीप्रकरणी विक्टर वॅन नाईकेर्क (२६) याला ४ कोटींच्या मेथाक्युलॉन या ड्रग्जसाठी आणलेल्या ११ हजार ९९८ ग्रॅमची क्रिस्टलाईन पावडरसह अटक केली आहे. विक्टरचा दक्षिण आफ्रिकेत पॅट्री कॅफे इन कॅपेटाऊन नावाचे हॉटेल आहे. इंडिगोच्या फ्लाईटमधून तो मुंबईत आला होता. >८४ हजार किमतीचे केसर जप्तकेरळच्या कासारगोड येथील रहिवासी असलेल्या तीन प्रवाशांकडून तब्बल ३२ लाख ५९ लाख किमतीचे २६ किलोचे केसर जप्त करण्यात आले आहो. यामध्ये चॅम्पियन लीगमध्ये फुटबॉल मॅचमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईहून निघालेल्या फुटबॉल प्लेयर अबुबकार सिद्दिकी तुरुथी बशीर (३१)लाही अटक करण्यात आली आहे. तो यापूर्वी आयसलँड येथील आटर््स अ‍ॅण्ड स्पोटर््स क्लबामधून फुटबॉल खेळला आहे. त्याच्याकडे १० लाख ८४ हजार किमतीचे ८हजार ६७५ गॅ्रमचे केसर आढळून आले. त्याच्यासह मुहम्मद बनुर अहमद (२९), मुनीर बेरन (२६) यांनाही केसर तस्करीप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.