शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

पायाभूत सुविधांना ‘अच्छे दिन’

By admin | Published: February 05, 2017 4:10 AM

सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी

- अमोद काटदरे, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष जयंत म्हैसकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात म्हैसकर यांची प्रकट मुलाखत निवेदक अरविंद विंझे आणि शैलेश पेठे यांनी घेतली. त्या वेळी म्हैसकर बोलत होते. ते म्हणाले की, रस्ते हा पायाभूत सुविधांचा कणा आहे. देशभर रस्त्यांचे सक्षम जाळे विणून चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परदेशांतील रस्त्यांच्या धर्तीवर येथे रस्ते विकसित केले जाऊ शकतात. रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारने पथकर आकारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रचंड नाराजी व्यक्त केली. मात्र, चांगली सेवा दिली की, ते पथकर भरण्यासाठी हात आखडता घेत नाहीत.ते पुढे म्हणाले की, माझे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. शाळा ही आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. ही आपल्याला घडवते. आपला अर्धा वेळ शाळेत जातो. शाळेत जे शिकाल, त्याचा भविष्यात फायदा होतो. त्यामुळे अधिक लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. व्यवसायाचे बाळकडू वडील दत्तात्रेय म्हैसकर यांच्याकडूनच मिळाले. व्यवसाय करण्याचे माझेही ठरलेले होते. मात्र, कोणता ते निश्चित नव्हते. वडिलांकडून ५० हजारांचे भांडवल घेऊन व्हिडीओ कॅसेटचा व्यवसाय केला. त्यातून मिळालेला नफा त्यांना परत केला. वडिलांची आयडियल रोड बिल्डर्स ही कंपनी असतानाही २००२ मध्ये एमईपीची स्थापना केली. रस्ते विकास आणि देखभाल, या नवीन संकल्पनेमुळे सुरुवातीला बँकांकडून कर्ज मिळताना अडचणी आल्या. २०१० हे वर्ष या कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरले.