लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औद्योगिकीकरणामुळे राज्यात वाहनधारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, राज्यातील परिवहन विभाग तुटपुंज्या वाहनांसह आपले कर्तव्य पार पडत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्याच्या मोटार वाहन विभागाच्या ताफ्यात १७४ नवी वाहने दाखल होणार आहेत. राज्यस्तरीय आढावा समितीने वाहन खरेदीला हिरवा कंदील दिल्यानंतर सरकारने या खरेदीला मंजुरी दिली आहे.परिवहन आयुक्त आणि राज्यातील प्रादेशिक/उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहन खरेदीसाठी राज्यस्तरीय आढावा समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीने राज्यातील १५ प्रादेशिक आणि ३५ उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील सद्य:स्थितीतील वाहनांची तपासणी केली. राज्यातील मोटार वाहन विभागासाठी समितीने १७४ वाहनांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले. समितीने अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता कर्तव्य बजावण्यासाठी तब्बल ७३ कार आणि १०१ जीप खरेदीसाठी मान्यता दिली. विशेष म्हणजे, बेकायदेशीरपणे ‘मॉडीफाय’ कारवर कारवाई करणाऱ्या भरारी पथकासाठी ६७ (जीप) वाहनांची मंजुरी देण्यात आली आहे. तर सीमा तपासणी नाके या विभागासाठी २४ (जीप) वाहनांचीदेखील शिफारस केली आहे. शासनाच्या खरेदी नियमांप्रमाणे अटी व शर्तीनुसार वाहन खरेदी करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.पदपदांची वाहन प्रकार संख्याजीपकार परिवहन आयुक्त११ -अपर परिवहन आयुक्त११-सहपरिवहन आयुक्त११-उपायुक्त (लेखा)११-परिवहन उपायुक्त ४४-सहायक पोलीस आयुक्त११-प्रादेशिक परिवहन अधिकारी११११-उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी ५३५३-भरारी पथक--६७वायुप्रदूषण पथक --१०सीमा तपासणी नाके--२४एकूण-७३१०१
परिवहन विभागाला येणार ‘अच्छे दिन’
By admin | Published: June 06, 2017 6:04 AM