मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर धकाधकीच्या जीवनात कायमच वीकेंडची वाट बघत असतो. कामाचा शीण वीकेंडमध्ये मजा करून निघून जावा, यासाठी मुंबईकरांची धडपडदेखील नेहमीचीच. मुंबईकरांना २०१६ साली तब्बल सात सार्वजनिक सुट्या सोमवारी मिळणार आहेत. त्यामुळेच मुंबईकरांचे पुढच्या वर्षीची वीकेंड्स प्लॅनिंग जोरदार होणार यात शंकाच नाही.पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नवीन वर्षाच्या २०१६ च्या दिनदर्शिकेची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशित होतील. पुढील वर्षी २०१६ मध्ये तब्बल सात सुट्या सोमवारी म्हणजे रविवारला जोडून येत आहेत, तर चार सुट्या रविवारी आहेत. नव्या वर्षात २०१६ मध्ये होळी आणि गुड फ्रायडे, डॉ. आंबेडकर जयंती आणि श्रीरामनवमी, दसरा आणि मोहरम या सुट्या रविवारला जोडून आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना टूरटूरची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)२०१६ मधील सोमवारच्या सुट्या महाशिवरात्रीसोमवार७ मार्च स्वातंत्र्य दिन सोमवार१५ आॅगस्टश्री गणेश चतुर्थी सोमवार५ सप्टेंबरबकरी ईद सोमवार १२ सप्टेंबरदीपावली - बलिप्रतिपदा सोमवार ३१ आॅक्टोबरगुरूनानक जयंतीसोमवार १४ नोव्हेंबरईद-ए-मिलादसोमवार१२ डिसेंबरसन २०१६ मधील उत्सवांचे दिवसप्रजासत्ताक दिनमंगळवार २६ जानेवारीहोळी - धूलीवंदन गुरुवार २४ मार्चडॉ. आंबेडकर जयंतीगुरुवार १४ एप्रिलमहाराष्ट्र दिनरविवार १ मेपारसी न्यू इयरबुधवार १७ आॅगस्टमोहरमबुधवार १२ आॅक्टोबरछ. श्री शिवाजी महाराज जयंतीशुक्रवार १९ फेब्रुवारीगुड फ्रायडे शुक्रवार २५ मार्चश्री रामनवमी शुक्रवार १५ एप्रिलबुद्ध पौर्णिमा शनिवार २१ मेमहात्मा गांधी जयंतीरविवार २ आॅक्टोबरदीपावली - लक्ष्मीपूजन रविवार ३० आॅक्टोबरगुढीपाडवाशुक्रवार ८ एप्रिलश्री महावीर जयंती मंगळवार १९ एप्रिलरमज़ान ईदबुधवार ६ जुलैदसरा - विजया दशमीमंगळवार ११ आॅक्टोबरख्रिसमस - नाताळ रविवार २५ डिसेंबर
खूशखबर, २०१६ मध्ये सात सुट्या सोमवारी !
By admin | Published: October 06, 2015 2:12 AM