स्थिर सरकारचा परिणाम : बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला विश्वास
मनोज गडनीस - मुंबई
आर्थिक सुधारणांना वेग देण्याचे आश्वासन देणा:या भारतीय जनता पार्टीचे आलेले स्वबळावरील स्थिर सरकार यामुळे आगामी पाच वर्षात शेअर बाजारासह गुंतवणुकीच्या विविध घटकांत ‘फिल गुड’ फॅक्टर अनुभवायला मिळेल, असा विश्वास बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
शेअर बाजारातील घडामोडींसंदर्भात प्रिसिजन अॅनालिस्टचे व्यवस्थापकीय संचालक अमित मेहता म्हणाले की, स्थिर सरकार हा अत्यंत कळीचा मुद्दा होता. शेअर बाजारावर देशांतर्गत स्थितीप्रमाणोच आंतरराष्ट्रीय कारणांचा प्रभाव पडत असला तरी आर्थिक सुधारणांमुळे देशांतर्गत स्थिती अधिक मजबूत होईल. निर्णय ठोस होतील, यामुळे आगामी तीन वर्षात सेन्सेक्स 3क् हजार अंशांना स्पर्श करेल, असे चित्र दिसते. तर, मार्केट व्हेवचे उपाध्यक्ष नचिकेत सहानी यांनी सांगितले की, शेअर बाजाराच्या पुढच्या हालचालीच्या प्रवासाचे विश्लेषण हे मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित आहे. विशेषत: गुजरातमध्ये औद्योगिक क्षेत्रला चालना देण्यासाठी त्यांनी आखलेली धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीकडे दिलेले लक्ष यामुळे विकास अधिक ठोस झाल्याचे दिसते. त्यांची कार्यपद्धती व्यावसायिक दिसते. त्यामुळे भाजपाचा जो जाहीरनामा आहे आणि त्यात दिलेल्या विविध पायाभूत विकास योजनांना वेग देण्याचे आश्वासन पाहता ते अधिक ठोस काम करतील आणि त्याचेच पडसाद शेअर बाजारात उमटताना दिसतील. पायाभूत सुविधा, रेल्वे, ऊर्जा, रस्तेनिर्मिती या प्रमुख क्षेत्रतील विकासदराने दशकभराचा नीचांक गाठत 5 टक्क्यांची पातळी गाठली आहे. याच क्षेत्रंना प्राधान्य देण्याचे जाहीरनाम्यात सूूचित आहे. तसेच, यालाच पूरक ठरेल अशा पद्धतीने कर रचेनत सुधारणा, उद्योगाला सुलभ कर धोरण यामुळे दृश्य स्वरूपातील विकास अनुभवण्यास मिळेल. याचे पडसाद शेअर बाजारावर होतील व डिसेंबर 2क्14 र्पयत सेन्सेक्स किमान 28 हजार अंशांच्या पातळीवर असेल.
स्थिर सरकारची स्थापना आता निश्चित झाल्याने अर्थव्यवस्थेचे प्रमुख इंडिकेटर मानल्या जाणा:या शेअर बाजार, रुपयाची स्थिती, सोने-चांदी या घटकांत नेमक्या काय आणि कशा घडामोडी होतील, याचा वेध ‘लोकमत‘ने घेतला.
गेल्या तीन वर्षापासून शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे किमान 66 महाकाय कंपन्यांनी शेअर बाजारातील
आपली एण्ट्री रोखून धरली होती. मात्र, बाजारात दीर्घकालीन तेजी असल्याची खात्री पटल्यानंतर ऑगस्टपासून पुन्हा एकदा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) च्या माध्यमातून बाजारात येतील.
सेबीकडून सर्व प्रक्रियेची मान्यता पूर्ण केलेल्या 43 कंपन्या सध्या योग्य वेळेची वाट पाहत आहेत. यामध्ये ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्रचर, आयटी, एफएमसीजी कंपन्यांचा समावेश असल्याने त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत आणखीही कंपन्या बाजारात येऊ शकतात. 55 कंपन्यांच्या माध्यमातून डिसेंबर 2क्14 र्पयत किमान साडे आठ हजार कोटींच्या भांडवलाची उभारणी होणार आहे.
करेक्शनची शक्यता पचवली
गेल्या पाच सत्रंत 28क्क् अंशांपेक्षा जास्त ङोप सेन्सेक्सने घेतली आहे. या तेजीचा फायदा घेत अनेकांनी विक्री करत एक्ङिाट घेतली आहे. पण, बाजाराने करेक्शनची शक्यता गृहीत धरली असल्याने तेजीमध्ये खंड पडण्याची शक्यता नसल्याचे मत वाधवा असोसिएट्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ जी.एस. घोष यांनी व्यक्त केले.
सोन्याची झळाळी कमी होणार
भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय सोन्यामुळे अर्थव्यवस्थेची डोकेदुखी मात्र वाढविली होती. परंतु, ज्या वेळी शेअर बाजारात तेजी असते, त्या वेळी गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीत फारसे सक्रिय नसतात. या पाश्र्वभूमीवर आगामी किमान वर्षभरात सोने प्रति तोळा 25 हजारांच्या पातळीवर असेल आणि नवे सरकार सोने-चांदीबद्दल जे धोरण ठरवेल, त्या अनुषंगाने सोन्याच्या किमतीचा प्रवास निश्चित होईल, असे सोने विश्लेषण कैलाश झवेरी यांनी केले.
रुपयामुळे जादा खुशी, थोडा गम
अमेरिकी डॉलरच्या पुढे मे 2क्13 पासून 27 टक्क्यांची घसरण नोंदविणा:या रुपयाला स्थिर सरकारची शक्यता दृष्टिपथात आल्यापासून बळकटी मिळाली आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात परकीय गुंतवणुकीला चालना देण्याचे आश्वासन आहे. मोदींच्या पारडय़ात स्थिर सरकारचा कौल पडल्यामुळे आता परकीय गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर होईल, अशी आशा आहे. असे झाल्यास अमेरिकी डॉलर व अन्य परकीय चलनांचा ओघ भारतात वाढेल. यामुळे रुपया बळकट होतानाच परकीय चलनाची देशांतर्गत उपलब्धी वाढल्याने बाहेरून महागडय़ा दराने डॉलर खरेदी करून आयात खर्च भागवण्याची वेळ सरकारवर येणार नाही, परिणामी महागाई नियंत्रणात येईल, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. सुमित्र जहागीरदार यांनी व्यक्त केले. मात्र, त्याच वेळी डॉलरच्या तुलतने रुपया मजबूत झाल्यास याचा नकारात्मक परिणाम निर्यातीवर होईल व त्याला खीळ बसेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. 2क्14 च्या वर्षात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 55 ते 56 च्या पातळीवर स्थिरावताना दिसू शकेल.