मुंबई : गणेशोत्सवा दरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ३२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या आधीच घोषित केलेल्या ७४ गणपती विशेष गाड्या व्यतिरिक्त आहेत. या अतिरिक्त ३२ गणपती विशेष गाड्यांच्या वेळा, थांबे आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. सर्व गणपती विशेषचे बुकिंग ८ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (१६ सेवा) ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दि. १३ ते २० ऑगस्ट (८ सेवा) दररोज ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून १३ ते २० ऑगस्ट (८ सेवा) दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा) ही गाडी नागपूर येथून १३, १७ आणि २० ऑगस्ट (३ सेवा) रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी मडगाव येथून १४, १८ आणि २१ ऑगस्ट (३ सेवा) रोजी रोजी १९.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. पुणे - कुडाळ विशेष (२ सेवा) ही गाडी १६ ऑगस्ट रोजी पुणे येथून ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी १६ ऑगस्ट रोजी कुडाळ येथून १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल. पुणे - थिविम/कुडाळ-पुणे विशेष (४ सेवा) ही गाडी पुणे येथून १२ आणि १९ ऑगस्ट रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिविम येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. विशेष गाडी कुडाळ येथून दि. १४ आणि २१ ऑगस्ट रोजी १५.३० वाजता सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५०ला पोहोचेल.
पनवेल - कुडाळ/थिविम - पनवेल विशेष (४ सेवा) ही गाडी पनवेल येथून १४ आणि २१ ऑगस्ट रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी थिविम येथून दि. १३ आणि २० ऑगस्ट रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.