शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

कोकणवासीयांसाठी खूशखबर! तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 7:40 PM

कोकण रेल्वे मार्गावरून खेड ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिली आहे.

मुंबई - कोकण रेल्वे मार्गावरून खेड ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वेवरून दादर ते सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यात कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या १५ वरून १९ एवढी करण्यात आली असून, ११ नोव्हेंबरपासून अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसला हे अतिरिक्त डबे जोडले जातील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रहिवाशांसाठी सोईच्या ठरतील अशा मोजक्याच मेल/एस्क्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावत असल्याने या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाने तुतारी एक्स्प्रेच्या डब्यांची संख्या १५ वरून १९ एवढी केली आहे. ११००३/डाऊन दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस आणि ११००४ अप सावंतवाडी/दादर एक्स्प्रेस या गाड्यांच्या डब्यांची सुधारित स्थिती पुढील प्रमाणे आहे. द्वितीय श्रेणी एसीचा एक डबा, तृतीय श्रेणी एसीचे दोन डबे, स्लीपर क्लासचे ८ डबे आणि जनरल क्लासचे ६,  एसएलआर क्लासचे २ असे एकूण १९ डबे असतील. ११ नोव्हेंबरपासून डाऊन आणि अप मार्गावरील तुतारी एक्स्प्रेस सुधारित डब्यांच्या रचनेसह धावणार आहे. 

 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी