ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आता पडेल मग पडेल अशी आशा दाखवत दडी मारलेला पाऊस येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र व गोव्यावर बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
तर, उद्या म्हणजे 17 पासून पुढील 48 तासांमध्ये कोकणामध्ये सगळीकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तर, 19 जूनपासून नंतरच्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची बरसात होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसेच, विदर्भातल्याही काही भागांमध्ये 19 जूननंतरच्या 48 तासांमध्ये पावसाची बरसात होईल असा अंदाज आहे.
हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला, तर बहुतांश महाराष्ट्राची पाण्याची आस भागेल आणि जनतेला दिलासा मिळेल अशी चिन्हे आहेत.
शाळेतल्या चिमुकल्यांनी ये रे ये रे पावसा म्हणत वरूणराजाला घातलं साकडं. (व्हिडीयो - शिवाजी सुरवसे)
कोल्हापूरच्या ज्योतिबाला पावसाचा अभिषेक