सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती असताना पुण्यात पडलेल्या पावसामुळे उजनी धरण बुधवारी शंभर टक्के भरले आहे. सध्या उजनी धरणातून भीमेत दीड लाख क्सुसेक पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली उजनी धरणाची बुधवारी सकाळी अकरा वाजताची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. उजनी पाणी भरले: ११६.९९ टीएमसी, टक्केवारी: ९९.५६ टक्के, भीमेत विर्सग: १ लाख ५0 हजार क्सुसेक, वीजनिर्मिती: १६00, अशा प्रकारे नदीत विसर्ग १ लाख ५१ हजार ६00 क्सुसेक. मुख्य कालवा: २५00, बोगदा: १२00, दौंड विर्सग: १ लाख १५ हजार ९१९ क्सुसेक. नीरा प्रणाली धरण विर्सग: भाटगर: १३ हजार ९८0, निरादेवघर: १९ हजार ६५0, गुंजवाणी: ३ सहिर ५४, एकूण वीरधरण विर्सग: ७८ हजार ३२५ क्सुसेक. उजनी व वीरधरणातील विसर्ग कमी झाला आहे.
सध्या माळशिरस तालुक्यातील अकलुज व भीमेकाठच्या पंढरपुरात पूरपस्थिती आहे. भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत. माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या बाधीत होणाºया कुटुंबांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
उजनी धरणात बंडगार्डनकडून येणारा विर्सग लाखाच्या पुढे आहे. बुधवारी सकाळी पुन्हा पुण्यात पावसाने जोर धरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बंडगार्डनकडून येणारा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.