शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

आनंदाची बातमी; आता घरबसल्या होणार विठुरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 5:08 PM

थेट दर्शनासाठी दोन कंपन्यांशी करार; मंदिर समितीच्या उत्पन्नात भर पडणार

ठळक मुद्देआजारी, अपंग या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाºया भाविकांना इंटरनेटवर जिओ टीव्ही व टाटा स्कायच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन घेता येणारमंदिरे समितीने जिओ कंपनी व टाटा स्काय कंपनीला विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क दिले पंढरी नगरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना त्या उत्पन्नातून आणखी चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार

सचिन कांबळे  

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट दर्शन दाखविण्याचे हक्क दोन कंपन्यांना देण्यात आले आहेत़ तसा करार झाला असून यामुळे मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

पंढरपुरात रोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज विठ्ठल मंदिरात जाणे प्रत्येक भाविकांना शक्य होत नाही़ तसेच यात्रेच्या गर्दीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाºया भाविकांना घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे. या हेतूने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन सुरु करण्यात आले आहे.

श्री विठ्ठलाचे थेट दर्शन पुरविण्याबाबत मंदिर समितीकडून हक्क  देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यामुळे अनेक टीव्ही चॅनलने हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र मंदिरे समितीने जिओ कंपनी व टाटा स्काय कंपनीला विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क दिले आहेत़

आजारी, अपंग या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाºया भाविकांना इंटरनेटवर जिओ टीव्ही व टाटा स्कायच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर समितीला यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यामुळे पंढरी नगरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना त्या उत्पन्नातून आणखी चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी