शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडाची मे महिन्यात पुन्हा ३ हजार घरांची सोडत!

By admin | Published: August 11, 2016 5:03 AM

मुंबईतील ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी यशस्वीरित्या सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यांत सुमारे ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर

मुंबई : मुंबईतील ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी यशस्वीरित्या सोडत काढल्यानंतर आता पुढील वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यांत सुमारे ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या तीन हजार घरांमध्ये सर्वसामान्यांच्या घरांसह गिरणी कामगारांच्या घरांचाही समावेश असेल. गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांच्या घरांसाठीची सोडत स्वंतत्ररीत्या काढण्यात येणार आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील तब्बल ९७२ घरांसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बुधवारी सकाळी ९ वाजता घरांची सोडत सुरू झाली. लॉटरीची प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होती. ९७२ घरांसाठी प्राधिकरणाकडे तब्बल १ लाख ३६ हजार ५७७ अर्ज दाखल झाले होते. या अर्जदारांपैकी ९७२ भाग्यवंताना मुंबईत म्हाडाचे घर मिळाले आहे. या सोडतीच्या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात म्हाडाच्या एकूण ३ हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या घरांमध्ये गिरणी कामगारांसह सर्वसामान्यांसाठीही घरे असतील. मात्र, ती किती असतील? याबाबतचा आकडा सध्या तरी निश्चितरीत्या सांगता येणार नाही. गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांसाठीच्या घरांची सोडत स्वतंत्ररीत्या काढली जाईल.’मुंबई शहर आणि उपनगरात घरे बांधण्यासाठी भूखंड शिल्लक राहिलेले नाहीत. घरांच्या निर्मितीसाठी मुंबई महानगर प्रदेशात ८३८ हेक्टर जमीन महसूल विभागाकडून घेण्यात येणार आहे. गृहनिर्माण विभाग पोलिसांना घरे देण्याबाबत म्हाडा सकारात्मक आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी) मुंबई शहर आणि उपनगरात घरे बांधण्यासाठी भूखंड शिल्लक राहिलेले नाहीत. घरांची मागणी वाढत असली, तरी त्या तुलनेत घरांचा पुरवठा करण्यात म्हाडा अपयशी ठरले आहे. परिणामी, अधिकाधिक परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी मुंबई महानगर प्रदेशात ८३८ हेक्टर जमीन महसूल विभागाकडून घेण्यात येणार आहे.