शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

‘गुड टच, बॅड टच’च्या शिक्षणामुळे टळला अतिप्रसंग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 4:51 AM

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘पोलीस दीदी’ उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात आहे.

मुंबई : अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘पोलीस दीदी’ उपक्रमाअंतर्गत शाळकरी मुलांना लैंगिक शिक्षण दिले जात आहे. याच शिक्षणामुळे केजीतील ६ वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला. या प्रकरणी २५ वर्षांच्या नोकराला कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे.कुर्ला परिसरात ६ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. आईवडील दोघेही नोकरी करतात. त्याच परिसरात ती अन्य तीन मैत्रिणींसोबत खासगी शिकवणीला जाते. नेहाचे पालक आणि अन्य मैत्रिणींचे पालक आलटूनपालटून मुलींना घरी घेऊन येतात. बुधवारी सायंकाळी नेहाला अन्य मैत्रिणीच्या आईने तिच्या घरी नेले. नेहाचे आईवडील कामानिमित्त बाहेर होते. त्यांनी २५ वर्षीय नोकराला नेहाला घ्यायला पाठविले. दीड वर्षापासून तो त्यांच्या दुकानात काम करत असल्याने त्याच्यावर त्यांना विश्वास होता.नोकराने नेहाला मैत्रिणीच्या घरातून घेतले आणि त्याच इमारतीच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र शाळेत पोलीस दीदी उपक्रमाअंतर्गत तिला ‘गुड टच, बॅड टच’चे लैंगिक शिक्षण मिळाले होते. त्यामुळे तिने बचावासाठी आरडाओरड केली. तो ऐकून गच्चीवर आलेल्या सुरक्षारक्षकामुळे हा प्रकार उघडकीस आला. कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लालासाहेब शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला पोलिसांनी नोकराला पॉक्सो आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. न्यायालयाने त्याला ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.काय आहे ‘पोलीस दीदी’ उपक्रम?मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘पोलीस दीदी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत महिला पोलीस शाळेतील लहान मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाचे धडे देतात. चांगला, वाईट स्पर्श कसा ओळखायचा, यातून बाहेर कसे पडायचे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.