- मोहित कुलकर्णी
मुंबई, दि. २१ - टेक्नॉलॉजीमध्ये टॉपला असणारा-या गुगलने नवीन की-बोर्ड अॅप बाजारात आणले आहे. या की-बोर्ड अॅपला जीबोर्ड सुद्धा म्हटले जाते. भारतात मोबाईल धारकांना आजपासून याचा उपयोग करता येणार आहे. याआधी अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्टेलिया आणि आर्यलॅंमध्ये ही सेवा गुगलने सुरु केली आहे.
जीबोर्डचा साधा सरळ असा अर्ध असा की गुगल की-बोर्ड. ऑनलाइन गुगल सर्चसाठी जीबोर्ड हे सर्वात महत्वाचे असणारे फिचर अॅप असणार आहे.
जी-बोर्डच्या माध्यमातून आपण गुगलवर सर्च करु शकतो. जर एखाद्या मित्राने टेक्ट्स मेसेज किंवा व्हॉट्सअॅप मेसेज पाठिवाला आणि एखादा पत्ता विचारला तर त्याबद्दल तुम्हाला माहित नसेल. तेव्हा तुम्ही जीबोर्डच्या माध्यमातून लगेच शोधू शकता.
जीबोर्ड स्मार्ट फिचर आहे. याचबरोबर यामधून तुम्ही आणखी काही गोष्टी शोधू शकता. अगदी जीआयएफ, ईमोजीस सुध्दा तुम्ही शोधू शकता. जीबोर्डवर जलद टाईपिंग करता येते. याचबरोबर टेक्ट्स अंदाज, करेक्शन आणि काही प्राथमिक फिचरचा सपोर्ट जीबोर्डमध्ये करण्यात आला आहे.
आयओएस युजर्सं आयटुन्स स्टोअर्सच्या माध्यमातून जीबोर्ड मोफत डाऊनलोड करु शकतात. तसेच, जीबोर्ड आयफोन, आयपॅड आणि आयपोड टच या डिव्हाईससाठी वापराता येणार आहे.