गौरीशंकर घाळे, मुंबईभारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या विधेयकाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. वर्षानुवर्षे जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला विविदीत भूमी म्हणून रेखाटणा-या गुगल मॅपने सुधारणा केली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशात आता ही दोन्ही राज्ये भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात येत आहेत. अलीकडेचे केंद्रातील मोदी सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल तयार केले. या विधेयकानुसार भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासासह १०० कोटी पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारताचे चुकीचे नकाशे प्रसारीत होत आहेत. यात भारताच्या आंतराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आल्या. भारतीय नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवून त्यांचा विवादीत क्षेत्र असा उल्लेख करण्यात येत असे. हे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल आणले. या बिलातील कठोर तरतूदीचा धसका घेत गुगल मॅपने आपली चूक सुधारली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशातील तुटक रेषा काढण्यात आल्या असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात आला आहे.
गुगलने घेतला मोदींचा धसका
By admin | Published: May 10, 2016 4:03 AM