Vidhan Sabha Election : अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 09:12 AM2019-09-30T09:12:20+5:302019-09-30T09:24:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला गोपीचंद पडळकर यांनी धक्का दिला आहे.

Gopichand Padalkar against Ajit Pawar in baramati vidhan sabha election? | Vidhan Sabha Election : अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात?

Vidhan Sabha Election : अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात?

googlenewsNext

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जोर धरला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी पक्षांतर्गत तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. यातच, वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकणारे गोपीचंद पडळकर आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच, त्यांना भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदार संघातून तिकीट देण्यात येणार असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का देत महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी पडळकर यांनी केली होती. ही माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती. 

गोपीचंद पडळकर यांनी राजीमाना दिल्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार सकारात्मक असून पुढील दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. तसेच, सर्व पक्षांकडून मला ऑफर असल्याचेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते. त्यामुळे आज भाजपमध्ये मेगा भरती असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा सुद्धा प्रवेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास त्यांना बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळते. 
 

Web Title: Gopichand Padalkar against Ajit Pawar in baramati vidhan sabha election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.