शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

CM Uddhav Thackeray: गोपीनाथ मुंडेंची विनंती अन् बाळासाहेबांचा आदेश; उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 9:29 PM

बाळासाहेब कागदावर कधी आकडेमोड करत नव्हते, तुझे नगरसेवक किती, अपक्ष किती? एका क्षणात निर्णय घेतला असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

औरंगाबाद - सरकार येऊन अडीच वर्ष झाली. रोज स्वप्न मी पुन्हा येणार म्हणून पडतायेत. महाराष्ट्र पुढे नेणारी ही अडीच वर्षे तुमच्या आशिर्वादाने, प्रेमाने विश्वासाने झाली. ज्यांच्यासोबत भांडलो ते मित्र झाले आणि मित्र होते ते हाडवैरी झाले. एक काळ संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना भाजपा अस्पृश्य होते. पण २५-३० वर्ष आमचा उपयोग केला नंतर सत्ता आल्यानंतर शिवसेना तुम्हाला डोळ्यात खुपायला लागली. काढा यादी अटलजी आले तेव्हा किती होते आज किती आहेत. ? इतकी वर्ष तुम्हाला ज्यांनी जपलं, जोपासले आणि मोठे केले त्यांच्याच अंगावर आलात अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला. 

औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीगोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा किस्सा सांगितला, ते म्हणाले की, एक दिवस गोपिनाथजी घरी आले, औरंगाबादमध्ये भाजपाचा महापौर असावा ही विनंती केली. बाळासाहेबांनी त्यांची विनंती एका क्षणात मान्य करत भाजपाचा महापौर होईल असं सांगितले. बाळासाहेब कागदावर कधी आकडेमोड करत नव्हते, तुझे नगरसेवक किती, अपक्ष किती? एका क्षणात निर्णय घेतला आणि भाजपाचा महापौर बनवला. गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दावर बाळासाहेबांनी औरंगाबादेत भाजपाचा महापौर दिला. औरंगाबाद महापालिकेत भागवत कराड महापौर झाले आज ते वर गेलेत. वर म्हणजे केंद्रात गेलेत असं उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) सांगितले. 

भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका

तसेच भाजपा प्रवक्त्यांच्या वाचाळपणामुळे देशाची अब्रु गेली. तुम्ही ज्या दिशेने जात आहात कुठे नेऊन ठेवणार आहात माझा हिंदुस्थान? शिवसेना बदनाम होऊ शकत नाही. कुठल्याही आपत्तीत रक्तदान करायचा असेल तर शिवसैनिकांच्या रांगा लागतात. शिवसेनेची पाळमुळे खोलवर रुजली आहेत. कितीही आदळआपट केली तरी शिवसेना संपवू शकत नाही. शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत म्हणून तुमच्यासमोर येऊ शकतो. आमच्या हिंदुत्वाची मापं काढू नका. ह्दयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे गदाधारी नाही. आजच्या सभेत भाड्याने आणलेली लोक आहेत का? वज्रमूठ करून दाखवून द्या. जो देशासाठी मरायला तयार आहे तो आमचाच आहे. त्याचे रक्षण करणे हे आमचे हिंदुत्व आहे. तुमच्या दर्शनाने माझ्यामध्ये लाखो हत्तीचं बळ आलेले आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

नाव बदलायला आता बदलू शकतो, पण...; औरंगाबाद नामांतरावरून उद्धव ठाकरे संतापले

कंत्राटदारांना तुरुंगात टाकाहिंदुत्व आपला श्वास ह्याच मैदानात शिवसेनाप्रमुख बोलले. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही? जुनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजीनगरला पाणी द्या असं अधिकाऱ्यांना सांगितले. जुन्या समांतर योजनेला पैसे देणार आहे. आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

शिवसेनेला आव्हान देण्याची औलाद जन्माला यायचीय; राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGopinath Mundeगोपीनाथ मुंडे