शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गोपीनाथ मुंडे यांचे कार्य अविस्मरणीय - दानवे

By admin | Published: June 04, 2016 3:34 AM

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुुंडे यांनी कायम कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यांचे राजकीय संस्कार आपल्यावरही आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले.

परळी (बीड) : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुुंडे यांनी कायम कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यांचे राजकीय संस्कार आपल्यावरही आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताहालाही प्रारंभ झाला.पांगरी येथील गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोपीनाथगडावर हजारोंचा नाथसागर उसळला होता. याप्रसंगी अपंगांना साहित्याचे वाटप, पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ, ई-हेल्थ सेवा आदी कार्यक्रमांचा प्रारंभ झाला.प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, अमित पालवे, गौरव खाडे, केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंंग ठाकूर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, रासपचे अध्यक्ष आ. महादेव जानकर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी समाधीस्थळी जाऊन गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. गोपीनाथ मुंडेंना पंकजा मुंडे यांच्या रुपाने उभा महाराष्ट्र पाहत आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे सूचक वक्तव्यही यावेळी दानवे यांनी केले. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांना सत्तेत बसविण्याचे काम केले आहे. ते नेते तर होते; पण दातेही होते, असे सांगून, गोपीनाथगडाच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.बीड जिल्ह्यात सलग तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर्षीही खरीप व रबी हंगाम वाया गेला. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९०० कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करून दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांचा खासदार व आमदारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.रावसाहेब दानवे यांनी गेल्या ३५ वर्षांत गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातील आठवणींचा पट उलगडला. गोपीनाथ मुंडेंना पंकजा मुंडे यांच्या रुपाने उभा महाराष्ट्र पाहत आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. विचार ज्योतचे आगमनदेऊळगाव, सिंंदखेड राजा जि. बुलढाणा येथून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा घेऊन विचारज्योत लोकनेताचार्य ही पायी दिंंडी गोपीनाथगड स्थळावर आली. या दिंंडीत मोठ्या संख्येने त्यांचे चाहते सहभागी झाले होते. या विचारज्योतीने उपस्थितांचे लक्ष वेधले.