उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. जे आरे करत होते, आज शेवटी तुमचेच सरकार आहे आणि तुम्हीही त्याच जागेवर कारशेड उभी करत आहात. लोकांना त्रास झाला, किती खर्च झाला? पण विरोधासाठी विरोधात हे भाजपचे धोरण आहे. फडणवीसांनी कायदेशीर अडचणी उभ्या केल्या. आरेची शेकडो झाडे तोडून पर्यावरणाचा नाश केला आणि शेवटी आलात कुठे? हे यांचे राजकारण आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
मणिपूरला काय चालले आहे? गृहमंत्री सांगत आहेत, रक्ताचा एक थेंब न सांडता आम्ही राम मंदिर बांधले. देशाच्या गृहमंत्र्यांकडे इतकी अपूर्ण माहिती आहे. मणिपूरमध्ये आज हे रक्तपात सुरू आहे, गृहमंत्री रोखू शकले नाहीत. आता प्रश्न राहिला राम मंदिराचा. तुम्ही म्हणता रक्ताचा एक थेंब न सांडता राम मंदिर मिळाले. तुम्ही नसाल तिकडे, सगळे तिकडे प्रमुख हिंदुत्ववादी लोक होते. गोधरा कांड काय होतं? ते देखील बलिदान होते ना. तेही तुम्ही विसरलात सत्तेवर आल्यावर. जर तुम्हाला मंदिराचे श्रेय द्यायचे आहे, तर ते सर्वोच्च न्यायालयाला द्या, असे मत राऊत यांनी मांडले.
छगन भुजबळांवर काय विश्वास ठेवता. ईडी आणि सीबीआयला घाबरून जाणारी, पळणारी लोक आहेत ही. डरपोक नंबर एक या चित्रपटातील हे सगळे विलन आहेत. भविष्यात यांच्यावर कोणीतरी चित्रपट काढला पाहिजे. यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी खंजीर खुपसला आहे, अशी टीका राऊत यांनी केली.