मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनात अद्याप एकही दिवस कामकाज झाले नसल्याबद्दल काँग्रेस सदस्य नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज चालविण्याची मुख्य जबाबदारी सरकारची असते. विरोधक कर्जमाफीवरुन स्थगन आणत असतील तर आठ दिवसात हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने त्यावर काय भूमिका घेतली याचा खुलासा व्हायला हवा. सरकारकडून कसलेच प्रयत्न झालेले नाहीत. उलट सत्ताधारी मंत्री आणि आमदारच वेलमध्ये जमा होऊन घोषणाबाजी करत आहेत. हे कसले सरकार आणि ही कसली लोकशाही. सत्ताधारी बाकावर बसून मागणी कुणाकडे करताय, आंदोलनच करायचे असेल तर मग राजीनामे द्या आणि रस्त्यावर उतरा असे आव्हान राणे यांनी दिले.
अधिवेशन चालविणे ही तर सरकारची जबाबादारी - नारायण राणे
By admin | Published: March 18, 2017 1:00 AM