शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील - महसुलमंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:25 IST

शेतकऱ्यांनी शासनाच्या या विविध योजना समजून घ्याव्यात व त्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा. यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करेल. तसेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. असे आश्वासन...

 जळगाव  - जमिनीची उत्पादकता वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या या विविध योजना समजून घ्याव्यात व त्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा. यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करेल. तसेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. असे आश्वासन राज्याचे महसुल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.     घोडसगाव ता. मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई शुगर्स ॲण्ड एनर्जी लि. कारखान्याचा चतुर्थ गळीत हंगाम शुभारंभ कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते तर 12 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर माजी महसुलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय सावकारे, महानंद, मुंबई च्या अध्यक्षा मंदाताई खडसे, कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव, व्हाईस चेअरमन ॲड रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचेसह कारखान्याचे संचालक मंडळ, जिल्हयातील विविध पंचायत समित्यांचे सभापती, नगरपालिकांचे नगराध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.     उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांजवळ असलेल्या जमिनीत अधिक उत्पन्न घेतल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. संत मुक्ताई शुगर अँन्ड एनर्जी ली. साखर कारखानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांना साखरेसोबत सहवीज निर्मिती प्रकल्पापासून मिळणारे उत्पन्नही मिळणार आहे. शेती ही तोट्याची असते हा शब्दच आता पुढे कुणी वापरणार नाही. यासाठी शासनाच्या माध्यमातून आता शेतातील पिकाच्या प्रत्येक घटकांची विक्री होणार आहे. यासाठी शासन ज्या भागात ज्या पीकांचे उत्पादन मोठया प्रमाणात होते त्या पीकावर त्याचठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्यास प्राधान्य देत आहे. या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. यापुढे शेतातील पीक काढल्यानंतर उरणारे घटक कारखान्यांच्या माध्यमातून विकत घेतले जाणार असून त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर घेतली जाणारी पिके आणि मातीचा अभ्यास करून त्या पिकांवर प्रक्रिया करणारी केंद्रेही स्थानिक ठिकाणीच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली जाणार असल्याने शेतकरी हा समृद्ध बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.     संत मुक्ताई शुगर अँन्ड एनर्जी ली. कारखाना शेतकऱ्यांना बेण्यासाठी बीनव्याजी कर्ज देणार असल्याने याचा फायदा येथील शेतकऱ्यांनी घ्यावा. ऊसाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थितांना केले. त्याचबरोबर मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याचे आमदार खडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. याबाबत तातडीने उर्जामंत्र्यांशी बोलणार आहे. तसेच जळगाव जिल्हयात पाऊस कमी पडला आहे त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच टंचाई परिस्थितीत ज्या उपाययोजना अवंलबिल्या जातात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजे - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर     शेती क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या शेतीत काळानुरुप बदल केले पाहिजेत. शेतीची वाटचाल यांत्रिकी करणाकडे होत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पीकाच्या प्रत्येक भागाचा उपयोग केला जाणार आहे. हा कारखाना कपाशीच्या झाडांचा भुसा 1700 रुपये टन तर सोयाबीन पीकाच्या झाडाचा भुसा 2100 रुपये टन या भावाने घेऊन या भुस्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. शेतीत फवारणी करताना शेतकऱ्यांनी किटनाशकांशी खेळू नये. कीटकनाशके एकमेकात मिसळू नये. आपल्याला विषबाधा होणार नाही याची काळजी घेतांना फवारणी करताना फवारणी किटचा वापर करावा असा दंडक शासन तयार करत असल्याचेही कृषीमंत्री पुंडकर यांनी सांगितले. मुक्ताईनगर हा औद्योगिक व कृषीच्या बाबतीत आदर्श मतदार संघ असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी काढले. यापुढे राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढण्यासाठी उसाला ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येण्यास मदत होईल - राज्यमंत्री दिलीप कांबळे     उस लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.     शेतकऱ्यांनी उस लागवडीकडे वळून आपले उत्पन्न वाढवावे. तसेच आपला विकास साधावा. संत मुक्ताई शुगर अँन्ड एनर्जी ली. कारखान्या शेतकऱ्यासाठी विविध प्रोत्साहनात्मक उपायायोजना राबवित असल्याने या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येण्यास मदत होईल. असा विश्वास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा - आमदार खडसे     केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असून या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपला विकास साधावा. शेतकरी समृध्द आणि सक्षम होण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांनीही ठिबक व स्प्रिंकलरचा वापर करुन उसाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्हाईस चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड वाढावी यासाठी उसाचे बेणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये एकरी बीनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार असून इतर कारखान्यांपेक्षा उसाला 50 रुपये अधिक भाव देणार असल्याचेही सांगितले. तसेच कारखान्याच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.   यावेळी कारखान्याच्यावतीने मागील वर्षी सर्वात जास्त उस पुरवठा करणाऱ्या दहा शेतकऱ्यांचा तर कृषी विभागाच्यावतीने उन्नत शेती, समृध्द शेतकरी या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, जमीन आरोग्य पत्रिका (स्वाईल हेल्थ कार्ड) स्वाईल ॲनॉलेसिस मिनी लॅबचे वाटप करण्यात आले. तर घरडा केमिकल्सच्यावतीने किटकनाशक फवारणी  किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.               यावेळी मान्यवरांचा कारखान्याच्यावतीने शाल, संत मुक्ताईची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजीराव आमले यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक विलास धायडे यांनी मानले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी