शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर सरकारचे नियंत्रण!

By admin | Published: March 17, 2015 1:11 AM

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषणा करण्यात आल्याने या मंदिराचा संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे.

उस्मानाबाद : अनागोंदी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषणा करण्यात आल्याने या मंदिराचा संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाखाली आला आहे. राज्यातील पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर या मंदिरांप्रमाणे तुळजा भवानी मंदिराचाही कारभार आता राज्य सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार निजाम राजवटीने १९०९ पासून घालून दिलेल्या देऊळ-ए-कवायत या नियमावलीनुसार सुरू होता. त्यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाची नोंद धमार्दाय न्यासाकडे असली तरी मंदिरातील सर्व व्यवहार या कवायतीत नमूद केल्याप्रमाणेच सुरू होते. मंदिरातील पुजाऱ्यांचे हक्क, विविध विधी, भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी आणि रोख रकमेत असलेले पारंपारिक हक्क तसेच त्याचा विनियोग आदींबाबतचे निर्णय या नियमावलीनुसार घेण्यात येत होते. तुळजाभवानी मंदिर संस्थान चॅरिटेबल अ‍ॅक्ट नुसार नोंदणीकृत संस्था असून, त्यावर जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पूर्वीपासून काम पाहत आहेत. दरम्यानच्या काळात मंदिरात झालेली अनागोंदी आणि कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार पाहता तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिराचा कारभार पारदर्शक होण्यासाठी त्यावर राज्य शासनाचे नियंत्रण असण्याची गरज व्यक्त करीत २०१० मध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानचा समावेश राजपत्रात करावा, असा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार फेब्रुवारी २०१४ मध्ये अनेक अडथळे पार करीत या संबंधी प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली होती. अखेर मंदिर संस्थानची राज्य शासनाने नोंद घेत २० फेब्रुवारी २०१५ रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पुजारी मंडळांकडूनही स्वागत : मंदिरात मागील २० वर्षांत झालेले आर्थिक गैरव्यवहार पाहता राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यापुढील काळात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीचा सामाजिक उपक्रमांसाठी योग्य वापर होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी व्यक्त केली. सर्व संस्थांसाठी लवकरच नियमावली : राज्य शासनाने तुळजाभवानी मंदिरासंदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारकडे नोंद असलेल्या सर्व मंदिर संस्थानसाठी लवकरच एकच नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसमोर झाले होते सादरीकरण : राज्य शासनाने अंतिम अधिसूचना जारी केल्याने मंदिर संस्थानचा कारभार अधिक पारदर्शक तसेच गतीशील करण्यास मदत मिळेल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केली.