ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 23 - काश्मीरमध्ये पीपल डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्याने तेथील शांतता चिघळली आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी, मते पूर्णपणे भिन्न आहेत. सामान्य लोकांनी कायदा स्वत:च्या हातात घेतल्याने प्रक्षोभ वाढत चालला आहे. सरकार कोणतेही प्रश्न संयम आणि शांततेने हाताळताना दिसत नाही. जीएसटीच्या रुपात सरकारने कररुपी दहशतवाद निर्माण केल्याची खरमरीत टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी रविवारी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात चिदंबरम यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा, जीएसटी, रिझर्व्ह बँकेची धोरणे, काश्मीर प्रश्न अशा विविध मुद्दयांवर प्रकाश टाकला.
"जीएसटी"च्या रुपात सरकारने कररुपी दहशतवाद निर्माण केला - पी चिदंबरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 3:42 PM