शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी

By appasaheb.patil | Published: May 14, 2019 5:27 PM

सोलापूर जिल्ह्यातील सहभागी १५९ गावांना मिळणार लाभ

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनमधील सहभागी गावांना शासनाकडून दीड लाखाची मदत करण्यात येणार सध्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना बालाजी अमाईन्स, प्रिसिजन कॅमशॉफ्ट आदी कंपन्यांकडून मदतजिल्ह्यातील २९० पैकी १५९ गावांनी सहभाग नोंदवित श्रमदानास सुरुवात केली

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या १५९ गावांना शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून प्रत्येकी दीड लाखाचा निधी इंधनासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख यांनी दिली़ हा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे़ यंदाचे हे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील २९० पैकी १५९ गावांनी सहभाग नोंदवित श्रमदानास सुरुवात केली आहे़ गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी मोठी चळवळ उभी केली आहे़ याशिवाय काही गावात जेसीबी, पोकलेन मशीनचा वापर सुरू आहे़ मशीन्ससाठी लागणारे इंधन आता शासनाकडून मिळालेल्या पैशातून भागविण्यात येणार आहे़ वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मृद व जलसंधारणाची दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांची कामे श्रमदानाव्दारे करतील अशा गावांना प्रोत्साहन म्हणून मशीनव्दारे करण्यात येणाºया कामाकरिता इंधनाच्या खर्चातील प्रतिगाव १ लाख ५० हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती सत्यवान देशमुख यांनी दिली.

खर्चाचा तपशील स्वतंत्रपणे ठेवापाणी फाउंडेशनमधील सहभागी गावांना शासनाकडून दीड लाखाची मदत करण्यात येणार आहे़ या निधीचा योग्य व पुरेपूर वापर व्हावा यासाठी शासनाचे अधिकारी प्रयत्नशील असणार आहेत़ याशिवाय लोकसहभागातून झालेल्या कामांचा तसेच मशीनव्दारे झालेल्या कामांचा तपशील स्वतंत्रपणे ठेवण्याच्या सूचना शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनास कळविल्या आहेत़ दरम्यान, ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावयाचा निधी, खर्च करण्याची कार्यपध्दती व खर्चाचा तपशील ठेवण्याच्या कार्यपद्धती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीने निश्चित करावी असे शासनाचे अवर सचिव सु़द़ नाईक यांनी पत्रान्वये कळविले आहे़ 

स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचा लागतोय हातभार- सध्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना बालाजी अमाईन्स, प्रिसिजन कॅमशॉफ्ट आदी कंपन्यांकडून मदत म्हणून मशीन्स पुरविण्यात येत आहेत. याशिवाय अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेकडून सहभागी गावांना ईश्वर चिट्टी या उपक्रमाच्या माध्यमातून १ लाख रुपये देण्यात येत आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाgovernment schemeसरकारी योजनाJalyukt Shivarजलयुक्त शिवार