सोलापूर : शरद पवार पावसात भिजले, त्यांच्या इडीच्या चौकशीनंतर वातावरण बदलले म्हणून राज्यातील सरकार बदलले याबद्दल बोलले जाते. पण आपण एकोप्याने वागलो नाहीत म्हणून आपलं सरकार आलं नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले.
भाजपने महापौर, उपमहापौर निवडीत वर्चस्व कायम ठेवले. यानिमित्त चंद्रकांतदादांकडून भाजपचे नगरसेवक, शहर पदाधिकाºयांना होटगी रोडवरील हेरीटेज हॉलमध्ये मेजवाणी देण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.पक्षाचे अनेक उमेदवार यामुळेच पडले. आता तीन वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले आहेत. हे किती दिवस एकत्र राहतील माहित नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शरद पवार यांनी खूप गांभीर्याने घेतली आहे. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याचे त्यांना माहित झाले आहे. पदवीधर मतदार नोंदणीत शहराचे योगदान खूप कमी आहे याबद्दलही चंद्रकांतदादांनी नाराजी व्यक्क्त केली.