शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

लोककलेचा सन्मान करणे शासनाचे कर्तव्य

By admin | Published: March 22, 2017 2:27 AM

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव

नवी मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार राधाबाई खोडे नाशिककर यांना प्रदान करण्यात आला. कला व संस्कृती टिकविण्यासाठी लोककलेचा व कलावंतांचा सन्मान करणे शासनाचे कर्तव्य असल्याचे मत या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे. राज्य शासनाच्यावतीने वाशीमध्ये राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राधाबाई खोडे नाशिककर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मनोगत व्यक्त करताना विनोद तावडे म्हणाले की, लोककला जीवन समृद्ध करते. त्यामुळे संस्कृती राहात असते. यामुळे लोककलेचा सन्मान करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कलेच्या क्षेत्रात राजकारण नको यासाठी मागील वर्षीचे पुरस्कार विजेते गंगारामबुवा कोठेकर यांच्या हस्तेच पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. वृद्धापकाळात कलाकारांची कोणी दखल घेत नाही, असे मत पुरस्कार विजेत्या राधाबाई यांनी व्यक्त केले. यावर यापुढे शासन अशा कलावंतांची दखल घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. २५ मार्चपर्यंत ढोलकी फड तमाशा महोत्सव सुरू राहणार असून राज्यातील नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत. पुरस्कार वितरण प्रसंगी महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील, सुरेश हावरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)