जळगाव : शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणाºयांपेक्षा खाणाºयांचीच चिंता अधिक आहे. राज्यकर्त्यांची ही मानसिकता बदलली पाहिजे, अशा शब्दांत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वी परदेशातून आयात करावी लागणारी ‘लाल मिलो’ खायची वेळ आपल्यावर येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शुक्रवारी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वडनेर भैरवच्या (नाशिक) अविनाश व रश्मी पाटोळे दाम्पत्याला देण्यात आला. सुताचा हार, शाल, श्रीफळ व दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.नेत्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवाले की बात (शेतकºयांची) करते हो, लेकीन लाखो खानेवाले है... त्यावर मी म्हणालो, बरोबर आहे. पिकविणाराच उद्ध्वस्त झाला तर खाणार काय? शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो. त्यामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय शासनाला घ्यावेच लागतील, असे ते म्हणाले.
सरकारला पिकविणाऱ्यांपेक्षा खाणा-यांची चिंता अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 5:39 AM