- श्याम बागुल।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीत सरकारच्या कामगिरीचा अहवाल जनता दरबारी मांडता यावा, यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाºयांना कामाला जुंपले आहे. आघाडी सरकार व सध्याच्या सरकारच्या कामगिरीचा तुलनात्मक अहवाल देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना युती सरकारने गेल्या साडेचार वर्षात काहीच कामगिरी केली नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी फडणवीस सरकारने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सर्व जिल्हाधिकाºयांना प्रश्नसंच पाठविला आहे. सरकारी योजनांच्या लाभार्र्थींची तुलनात्मक आकडेवारी, आरोग्य शिबिरांत किती रुग्णांची तपासणी झाली, राष्ट्रीय व राज्य महामार्गांची कामे, नवीन शाळा उभारणी, वीजपुरवठा, वृक्ष लागवड, जिल्हानिहाय गुंतवणूक, तसेच गेल्या साडेचार वर्षांत शेतकºयांना कर्जमाफीसोबतच पीकविमा, नैसर्गिक आपत्ती, बोंडअळी, गारपीट, दुष्काळी आदी सर्व प्रकारच्या मदतीची एकूण रकमेचा समावेश त्यात करण्याच्या सूचना आहेत. त्याचबरोबर, आवास योजनेत प्रधानमंत्री, शबरी, रमाई अशा सर्व प्रकारच्या घरकुलांचा समावेश करण्यात आला आहे.निवडणुकांसाठी याच माहितीचा आधारगेल्या आठवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाºयांना याबाबतचे ‘एक्सेल शीट’ पाठविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा आधार घेत, सरकार निवडणूक प्रचारात आपली प्रतिमा ‘उजळ’ करून घेणार आहे.