ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २५ - गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या कार्यकारी समितीसाठी उद्या शुक्रवारी निवडणुका होत आहेत. तथापि, या निवडणुका भाजयुमो गटास जिंकता याव्यात म्हणून सरकार निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे व विद्यापीठावरही दबाव आणत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी गुरुवारी येथे केला.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणो आणि एनएसयूआय ह्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष टेराज मुल्ला यांच्या उपस्थितीत फालेरो यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. आम्ही विद्यापीठात कधी हस्तक्षेप करत नाही. विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचे मंदीर आहे. शिक्षण क्षेत्र राजकारणापासून दूर ठेवायला हवे. तथापि, सरकारने सध्या विद्यापीठातील अधिका:यांना हाताशी धरून जे काही चालवले आहे ते अत्यंत आक्षेपार्ह व अन्यायकारक आहे, असे फालेरो म्हणाले. एनएसयूआयची प्रतिनिधी प्रचिती गुरव हीने सादर केलेला उमेदवारी अर्ज ऐनवेळी योग्य कारण न देता फेटाळण्यात आला आहे. वास्तविक उमेदवारी अर्जासोबत तिने सगळी आवश्यक कागदपत्रे सादर केल्याची पावती अगोदर तिला देण्यात आली होती. हा अन्याय विद्यापीठाने दूर केला नाही तर निवडणूक प्रक्रियेशी खेळणा:या संबंधित अधिका:यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी आम्ही करू, असे फालेरो यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी कुलपती या नात्याने राज्यपालांनी हस्तक्षेप करून निपक्षपाती चौकशी करून घ्यावी, अशीही मागणी फालेरो यांनी केली. गोवा विद्यापीठात लोकशाहीचा खून सुरू आहे. दिल्लीतील नेहरू विद्यापीठातही भाजप सरकारने हेच काम केले होते, असे फालेरो म्हणाले.
राणे यांनीही यावेळी बोलताना विद्यापीठाच्या निवडणुका ह्या चांगल्या वातावरणात व्हायला हव्यात असे मत मांडले. अशा प्रकारे कुणावर अन्याय होऊ नये याची काळजी नवे कुलगुरू श्री. साहनी यांनी घ्यावी असे ते म्हणाले.
दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थी मंडळ निवडणुकीच्या रिंगणात एनएसयूआयसह, भाजपची भाजयुमो शाखा, टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी हा स्वतंत्र गट आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच समर्थक विद्याथ्र्याचा गटही उतरला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व गोवा विद्यापीठात मिळून एकूण 96 यूएफआर यापूर्वी निवडून आले आहेत. विद्यार्थी मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष, सरचिटणीस, महिला प्रतिनिधी व सहा सदस्य अशा पदांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजयुमोच्या कार्यकत्र्यानी प्रतिस्पध्र्याना धमकावणो व दादागिरी करणो असे प्रकार चालविल्याचे आरोप होत आहेत.
(खास प्रतिनिधी)