शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 7:27 AM

गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय अधिकाऱ्याच्या (गट अ आणि ब) कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला. कोरोनाकाळात अनेक अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला पण शासनाचा नियम नसल्याने त्यांच्या कुटुंबातील कोणालाही अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नव्हती. अधिकाऱ्यांच्या कुटुंबासही अनुकंपा तत्त्वाचा लाभ द्यावा, अशी राजपत्रित अधिकारी संघटनेची जुनी मागणी होती. गट ब आणि क या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भातील धोरणही शासनाने गुरुवारी जाहीर केले.

२००१ पर्यंत राज्यातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जात होती. मात्र  राज्य सरकारवर आर्थिक भार येतो, असे कारण देऊन सरकारने ते नंतर बंद केले. आजच्या निर्णयाने अधिकारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.- ग. दि. कुलथे, नेते, राजपत्रित अधिकारी महासंघ

अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी बहुतेकांना गट क किंवा ड मध्ये नोकरी मिळेल. म्हणजे या दोन गटांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांवर आजच्या निर्णयाने गदा आणली आहे. सध्या ही प्रतीक्षा यादी १३ हजार इतकी आहे. त्यांना नोकरी मिळेपर्यंत अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही नोकरी मिळणार नाही.- विश्वास काटकर, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :Mantralayaमंत्रालय